महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,28,072

सामानगडाचा रणसंग्राम

By Discover Maharashtra Views: 3631 1 Min Read

सामानगडाचा रणसंग्राम

सामानगड हा भीमसासगिरीचा हा पर्वत ओंकार स्वरूप आहे. याच पर्वतावर शिवाचा अवतार झाला होता .रामायण काळ, पांडव काळ व शिवकाळ हे सर्व ह्या पर्वताने पाहिले होते. पण आता तो पाहणार होता, विलक्षन असा रणसंग्राम
धारवाड प्रांताचे प्रांत अधिकारी दाजीकृष्ण पंडित यांच्या गद्दारीमुळे इंग्रजांनी हलकर्णीच्या माळावर तळ ठोकला. सामानगडचे किल्लेदार मुंजाप्पा कदम यांचा पुत्र दौलतराव यांनी इंग्रजांवर हल्ला चढवला. मराठयांनी विजय मिळवला. पण दौलतराव इंग्रजांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्या जिजाबा या नोकराने व चंद्रा या दासीने तमासगिरांचे सोंग घेऊन इंग्रजांपुढे नाचून दौलतरावांची सुटका केली.

रविवारची युद्धबंदी इंग्रजांनी पुकारून देखील शेवटी सामानगडावर तोफा डागल्या. साडेतीनशे सैनिकांनी जोराचा प्रतिकार केला. दारूगोळा कमी पडला; पण मराठे डगमगले नाहीत,
मुंजाप्पा कदम यांची सून चिमाक्कानं हाती तलवार घेऊन ती चोरखिंडीत रणचंडिका होऊन उभी ठाकली. गो-या माकडांना कापत सुटली. साडेतीनशेहून अधिक इंग्रजांना तिनं यमसदनाला पाठवलं. आपला पती युद्धात शहीद झाल्यामुळे तिने सती जाण्याचे ठरवले आणि चितेत उडी घेतली.
इंग्रजांच्या तोफा व बंदुकांपुढे मोजक्या असणा-या मराठय़ाचा टिकाव लागला नाही. शेवटी मुंजाप्पा कदम महादरवाजाजवळ हातात काठी घेऊन विरासन घालून बसले. कॅप्टन उठरणने त्यांच्या छातीत गोळी घातली; पण त्याअगोदरच मुंजाप्पा अनंतात विलीन झाले होते. मुंजाप्पा कदम यांच्या निश्चल प्रेताला देखील इंग्रज घाबरत होते.

माहिती साभार
दशरथ पाटील

Leave a Comment