महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,632

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१७

By Discover Maharashtra Views: 1347 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१७ –

आवश्यकता नव्हती तरीही जाड पात्याच्या नंग्या तेगी हातांत घेऊन मुकर्रब आणि इखलास, सरदार आणि हमिदुद्दीन कैद्यांभोवती पहारेकऱ्यांवर देखरेख करीत इकडे- तिकडे फिरत होते. एकाच भयाने. कुणी सांगावे. भुतांसारवे अचानक उपटणारे मरहट्टे आलेच आणि घडू नये ते घडलेच, तर याच खांबांना खुद्द आपणालाच जखडण्याचा हुक्‍्म होईल हजरतांचा याची खातरजमा होती म्हणून! एकसारखे बहादूरगडाच्या रोखाने बघत ते कुणाचीतरी वाट बघत होते. आणि कैद्यांभोवती हजारो हत्यारबंद हशमांत खळबळ माजली : “आ गये! आ गये!” बहादूरगडाच्या रोखाने धुळीचा लोळ उठवीत, शे-पाचशे पठाणांचे एक पथक आले. हाताच्या इशारतीनेच पाठच्या दौडत्या पथकाला रोखत बक्षी रुहुल्लाखान पायउतार झाला. त्याचा मालक आलमगीर गाझीनेच त्याला खलबतात घेऊन, कानमंत्र देऊन पिटाळला होता. भोवतीच्या कुणाकडेही ढुंकूनसुद्धा न बघता खांद्यावरच्या खिल्लतीआड दडलेल्या हत्याराच्या मुठीवर हाताची भक्कम मूठ आवळत, तरातर चालत थेट राजे आणि कुलेश यांच्या समोरच तो आला.

त्याला बघून लाचार अदबीने पुढे होत मुकर्रब म्हणाला, “क्‍या हुक्‍्म है आलमपन्हाका काफर कैदियोंके फैसलेमें?”

“चूप” मुकर्रबच्या पायांपासून डोक्यापर्यंत बेफिकिरीच्या नफरतीने बघत रुहुल्ला त्याच्यावर उखडला. कितीही झाले तरी मुकर्रब “दख्खनी’ होता. रुहुल्ला औरंगचा नेक, उत्तर हिंदुस्थानी “शिवा’ सरदार होता. खास कामावर नामजादी केल्यानेच तो हिरव्याकंच खिल्लतीत आला होता. खांद्याला जखडल्या छत्रपतींच्या समोर उभा ठाकत, कमरेवर हात ठेवून डोळे राजांच्या डोळ्यांत मगरुरीनं घुसवीत त्याने जाब केला, “खैर चाहते हो सुबेदार, तो ठीक सोचके जवाब दो। आलमपन्हा चाहते है तुम्हारा बयान, मौका है खुदाके खैरका आखरी – किस किल्लेमे रखा हे तुमने अपना शाही खजाना?” त्याने “सुभेदार’ असा केलेला उल्लेख राजांना आज पहिल्या प्रथमच ऐकायला मिळत होता. “हः” मानेवरचा रानटोळ झटकावा तसा रुहुल्लाचा सवालच राजांनी मानेबरोबर झटकला.

“हम पूछते है, कहां है तुम्हारा खजाना?” राजांची डोक्यावरची उंच माटाची, लाकडी विदूषकी टोपी खानाने गदगदा हालवली. जळत्या नजरेने खानाकडे बघताना राजांच्या नाकपुड्या संतापाने कशा फुलून उठल्या. जखडलेले छातवान अनावर संतापाने वरखाली झपापले. आतल्या आत खूप विचारांती त्यांनी साजेसा निवाडा आपल्याशीच घेतला होता. काही – काहीही न बोलण्याचा!

“बोलो, कौन-कौन थे फितूर तुम्हे शाही फौजसे? कौन-कौन भेजते थे खतवाले हशम तुम्हे?” हट्टाला पेटलेला रुहुल्ला राजांचा मुखडा डावा-उजवा गदगदा हलवून टाकत, भोवतीचे हशम अंगभर चरकावेत असा कडाडला.

आपल्या स्वामींशी चाललेली ती बेमुर्वती बघून कुलेश खोड्यातच तळमळते हलले. खोडा फोडण्यासाठी निष्फळ धडधड धडपडले.

“बोलो, गँगे हो गये क्या काफर? मामूली चीज हे। बताओ और जान बचाओ अपनी नादान।”

राजे खानाकडे नुसते रोखून बघत होते. कुठल्याही धमकीने वा गोडीगुलाबीने आणि सोबतच्या कविकुलेशां खेरीज कुणीही काही विचारल्याची दखल घेण्याच्या पार पलीकडे गेले होते ते. ते बोलते व्हावे म्हणून, “खजाना कहा है? फितूर कौन थे।” हेच सवाल आलटून-पालटून विचारून, कैक प्रकारांनी जंग-जंग पछाडून रुहुल्लाखान शेवटी थकला. त्याच्या कपाळावर उन्हाच्या तिरिपीने आणि एकसारख्या कंठशोष ओरडण्याने घामाचे थारोळे साचले. ते तर्जनीने निपटून टाकत शिवीच हासडावी तसे तो वैतागून म्हणाला, “नहीं जानता – मानता आलमपन्हाके गुनाहका नतिजा कुत्ते) भोग ले अपले गँगेपनकी अब सजा – मौत!”

जंग-जंग पछाडले रुहुल्लाने राजांना बोलते करण्यासाठी, पण ब्रदेखील नाही बाहेर पडला त्यांच्या ओठांतून. त्याच ढंगाने कुलेशांना चाचपून बघताना तर खानाने आपला हमेशाचा “तुकडा फेकी”चा मन्सबीचा दाणागोटा बाहेर काढत चुचकारून छंदोगामात्यांना विचारले, “ये मरनेवालाही है अपनी मौतसे – होशियार शख्स हो तुम। बता दो कहाँ हे इसका, सल्तनतके बऱ्हाणपूर-औरंगाबादके लूटका छिपाया खजाना? कौन- कौन थे शामिल इसको शाही फौजके गहार कुत्ते? मरातबसे मालामाल कर देंगे शहेनशाह तुमको मन्सब बक्ष करके! बताओ। डरो नहीं अब इसको। बताओ”

गळ्यातला तख्ता-कुलाह, डुईची लाकडी टोपी डावी-उजवी झटकती हलवून खानाला त्यांनी इमानी चाकरीचा जसा खणखणीत सबकच दिला – “खान, मौका मिलता तो हमही पूछते यही सवाल तुमको! सारे हिंदोस्तांका खजाना हजम किया है, तुम्हारे शहेनशाहने! मन्सबके टुकडे फेंक कर खरीदा नही जाता कभी कवीका इमान! कुत्ते हो तुम, खंदेकी खिल्लत पहेनकर नाजसे हमारे स्वामीकी गर्दन हिलानेवाले बेमुर्वत!!”

“खामोश, लईम काफर।” अंगावर सापाचे वेटोळे पडावे तसा खान आक्रोशून उठला. झपकन पुढे होत त्याने मराठी दौलतीच्या कुलएखत्यार, छंदोगामात्यांच्या गालफडावर सणकावती थप्पड दिली. त्याच्या भिवया वाकड्या-तिकड्या झाल्या होत्या. दाढीचे केस रोधता न येणाऱ्या घुश्शाने दाभणासारखे ताठरले होते.

आपल्या लाकडी खोड्यातूनच ते बघताना राजे कुडीभर उफाळले. त्यांना जखडून टाकणारा खांबच हिंदकळला मुळापासून त्यांच्या ताकदवर धडपडीने!

फोडला! आता मात्र राजकुलाच्या बालपणापासूनच्या संस्कारांनी कटाक्षानं मनोमन करकचून बांधून टाकलेला मौनाचा बंधारा राजांनी फोडला. शब्दांचा अनिवार आतषखाना त्यांच्या तोंडून रुहुल्ला, मुकर्रब, इखलास यांच्यासह हरएक हशमाच्या काळजाची, मुहर्रमची खाई पेटवावी, तसा खाई पेटवीत बेलाग तडतडू लागला – “सांग तुझ्या मालिक “सुभेदारा’स खान! मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही पायांत! जन्मदात्या बापास कैद करून, त्यानंच बांधल्या लालकिल्ल्यात त्यास डांबून – तबिबाकडून जहराचं मालीश त्याच्या बुढ्ढ्या अंगाला फासणारं नाही भोसल्यांचं खानदान! भावांच्या पाठीत, तख्ताच्या हवसेनं खंजीर खुपसणारी नाही आमची भावकी!”

“खामोश। पाबन्द रख्खयो जबान!” थरथर कापणारा रुहुल्ला ओरडला. “काट दो इसकी गर्दन! इसको पैरके नीचे दो हाथीके! खाने डालो कृत्तोंको इसका मगरूर गोश्त!”

चारी बाजूने जळजळीत आरोळ्यांचा एकमेकांत मिसळता कालवा उसळला. तरीही बेडर- बेभान झालेले राजे बोलतच राहिले –

“अरे, खाल्लंच आमचं गोश्त कुत्र्यांनी तर त्यांची औलादही निपजेल इमानदार! सांग तुझ्या मगरूर मालिकला खान – जी भावांची केलीस, जन्म दिल्या बापाची केलीस, हयातभर इमानी चाकरी केलेल्या मिर्झा राजाची, दिलेरची केलीस; त्याहून काय करणार दुसरी हालत तू आमची? तैय्यार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी या क्षणाला!! ध्यानी ठेव म्हणावं त्याला – आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूख त्याच्या घशात इदल, कुत्बशाहीसारखा! इथला उंबरा अन्‌ उंबरा करील पैदा लहानथोर सेवा-संबा!!!”

राजे आपल्या आका अलीची नालस्ती काही रोकत नाहीत, हे बघून रुहुल्ला झटक्यात तिरीमिरीने पुढेच झाला. त्यांचे तोंडच बंद करावे म्हणून आपल्या पंजाने त्याने राजांचे दोन्ही ओठ एकाजागी घट्ट करण्यासाठी सांडशीपकडच घालायचा प्रयत्न केला. गर्दन झटकून ती उडवून लावत राजे शेवटचे पण वर्मी असे सर्वांना ऐकू जाईलसे ओरडले – “आम्हास मारून कधीच सुटणार नाही तुझा पापी हजरत सलामत! ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तो रचतो आहे, एवढे पापांचे डोंगर – त्याच्या आसपासही मिळणार नाही कबरीसाठीसुद्धा वावभर जागा त्यास!!

शिराचं नाव “भंडारा’ ठेवून, तोच तळहातावर घेतलेले आमचे जानकुर्बान मावळे – निघालाच परतायला तो उत्तरेकडं, तर खोदतील त्याचीच कबर याच मावळमातीत! बताव उसको – ठोकरसे फेंक दिये है, हमने उसके सब सवाल!! जाव!” तरीही राजे उभ्या कुडीभर राजसंतापाने अनावर थरथरू लागले. उभ्या आभाळाने ताकद एकवटून ढाळण्यासाठी जबरी तडाखा दिला तरी न चळता सूर्याचा तापगोल ब्िंबभर थरारेलच थरारेल तसेच राजे दिसले!! भोवतीच्या बघ्यांना क्षणात चाटून गेलं की, घुश्शात असले तरी आलमपन्हा आका अली ‘असे’ कधीच दिसले नाहीत!

असले काहीच आणि कधीच ऐकण्याची आदन नसलेल्या रुहुल्लाच्या अंगाचा कसा तिळपापड झाला नुसता! “चूप मनहूस कृत्ते;” ओरडताना नरड्याच्या धमन्या तटतटून फुगल्याच खानाच्या. झेपावत त्याने ज्या कानशिलांवर धाराऊ आणि थोरल्या आऊंची बोटे ‘आलबला’ घेत फिरली होती, त्याच कानशिलावर जबरदस्त थपडेचा खडखडता आवाज काढला!! खान घुश्शाने बेभान झाला होता. अशा काही जळजळीत नजरेने राजांनी खानाच्या हाताकडे बघितले की, त्या नुसत्या नजरेनेच त्याने आपला झणझणता हात पिरगळा बसावा, तसा मागे घेतला. पेटत्या आगीतून काढावा तसा! भोवतीचे हशम तर थरकून उठले होते. खोड्यात तळमळत्या कुलेशांनी असह्य संतापाने तळमळून- तडफडून गर्दन खाली टाकली.

भुईवर पचकन थुंकत नेमल्या कामगिरीत पुरता नाकामयाब झालेला खान स्वत:शीच पुटपुटला, “मर जायेंगे दोनों भी नाबकार काफर लोंडे कुत्तोंकी मौत। मुराद, दारा की नहीं वो हालत करेंगे पाक इस्लामके असली बंदे आका अली हरामजादोंकी! बू मिट जायेगी काफरोंकी दुनियासे।”

दणदण पाय आपटत, जनावरावर झेप टाकून आपल्या पथकासह खान रुहुल्ला बादशहाला कैद्याची बदतमिजी सांगायला निघूनही गेला. राजांनी उच्चारले शब्द जसेच्या तसे आपल्या हसरतच्या कानी घालण्याची त्याची शामतच नव्हती. दौडतानाच तो विचार करू लागला, ते शब्द सुमार करून दरबारी रिवाजात कसे काय पेश घालावेत!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment