महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,705

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६४

By Discover Maharashtra Views: 2534 11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६४ –

तिसरा प्रहर टळतीला गेला. कुम्हारबाडीत संभाजीराजे, त्र्यंयकपंत आणि निराजीपंत कुंभाराच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचाराच्या पाठलागाने हैराण होत होते. आपसूक उठून बाहेर येत नूरगंज बागेकडून येणाऱ्या वाटेला डोळे लावीत होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते. संभाजीराजांची उलघाल वाढीला लागली. “…आणि – आणि महाराजसाहेब आलेच नाही तर! तर – तर जेधेकाकांच्या संगतीने आज आग्ऱ्याबाहेर पडायचं. मथुरेच्या वाटेनं चाल धरायची. मथुरा! कुठं आहे? कशी आहे? तेथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, “तुमचे आबासाहेब कुठं आहेत?’ म्हणून तर? – मासाहेब! किती दिवस झाले, त्यांच्या हातून कपाळी शिवगंध नाही रेखून घ्यायला मिळालं! आणि धाराऊ? धाकल्या आऊसाहेब, रायाजी, अंतोजी, सैस, गोमाजीबाबा – त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले.

“टपूष्टपू्टपू” घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या. त्यांच्या मनीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हत्याराच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीबरून ताडकन वर उठले. निराजीपंतांकडे एक नजर देत ते तरातर कुंभाराच्या मेटाबाहेर आले. बाहेर श्रावणाची एक तुटकी सर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना दोन स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही घोडाइतांच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगडया होत्या. त्या स्वारांपैकी सर्जेराव जेधे पुढे झाले. सामोरे येत त्यांनी संभाजीराजांना मुजरा केला, “चला, टाकोटाक निगायचं हाय.” ते दबकून बोलले. “निघायचे?” क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराजसाहेबांशिवाय निघायचे?

कुठे? कशासाठी? सर्जेरावांच्या पिछाडीला असलेला घोडाईत पायउतार झाला होता. सर चुकविण्याचे “निमित्त’ करून त्याने थोडीशी मान झुकती ठेवली होती. त्या घोडाइताची सुराने, लगीने पावले पडत होती. पायीचे मावळी पायताण कुरकुरत होते. त्या पाबला-पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापट धगीने तटबंदीचा दगडी साज सरसरून यावा, तसे मोहरून उठले. ‘हे हे महाराजसाहेबच!’ मनाची रुजवात डोळ्यांनी पटवून देताच संभाजीराजे पायझेप टाकीत पुढे सरसे झाले.

राजे क्षणभर गडबडले. आश्चर्याने डोळ्यांना डोळे देणाऱ्या संभाजीराजांना त्यांनी स्वत:चे डोळे ताणते करून इशारा भरला. सावधगिरीचा! काही न बोलण्याचा! संभाजीराजे उमगावयाचे ते उमगले. “निराजी, तुम्ही बालाजीच्या सराईत जा. तिथे मथुरेचे दोन कवी आहेत. त्यांना सांगा – ‘हत्ती मथुरेच्या घाटावर येताहेत. नौका सिद्ध ठेवली पाहिजे!’” राजांनी निराजींना कानमंत्र दिला. मांड घेऊन निराजी सुटले. मात्र त्यांनी राजांना मुजरा केला नाही!

“त्र्यंबकपंत, फर्मावल्या वस्तू सिद्ध ठेवल्या?” राजांनी त्र्यंबकपंतांना विचारले. हातातील बोचके वर उचलून त्र्यंबकपंतांनी होकाराची मान डोलावली. “आम्ही कुंभाराचा निरोप घेतो.” संभाजीराजे सर्जेराबांकडे बघत राजांना म्हणाले. “चला. आम्हीही येतो.” राजे सर्वांसह कुंभाराच्या मेटात आले. आपल्या मेटावर काय घडते आहे, याची कुंभाराला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. तो आपल्या कामात दंग होता.

“बाबा, आम्ही निघतो.” संभाजीराजे त्याला म्हणाले. तो पुढे आला. “भाईर बारीस हाय नि!” तो थोडे मावळी, थोडे उत्तरी बोलला शंभूराजांनी कंठीचा मोतीकंठा उतरला. ती संधी साधून राजे हळूच पुढे झाले संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले – “कंठा द्या – पण एक सां जाताच पहारेकरी येतील. त्यास आम्ही दक्षिणेकडे औरंगाबादेच्या रो सांगणेस बोला!”

“बाबा, हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा!” संभाजीराजे कुंभार।ल। कठ दत म्हणाले.

“काय सरकार?”

“आम्ही औरंगाबादेस जातो आहोत. मुलखास कुणी आमची वाजीपुशी केल्यास सांगणे. येतो आम्ही!”

“जी.” कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला. पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे, सर्जेराव, त्र्यंयकपंत आग्ऱ्यातून “दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्याच्या हशमांनी हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हशमांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेली “दस्तके’ काढून दाखविली.

क्ला “कौनसी सवारी हे?” तरीही एका हशमाने सर्जेरावांना तराटणी देत सवाल केला. पुढे होत, राजांनी शहरातील रामसिंगाच्या हवेलीकडे पगडीचा रोख ठेवून जाब दिला.

“राणा रामसिंग की मेहमान सवारी! “सेवा’ दख्यनकी फर्जंद सवारी!”

मिर्झा राजाचा दरबारी असलेला वचक आठवून पहारेकऱ्यांनी दस्तके पाहून पथक सोडले! आता राजे “दक्षिणेकडे’ गेले ही भूमिका सर्वत्र उठणार होती सारे “दक्षिणवेशीबाहेर’ पडले. कुणीच काही बोलत नव्हते. आग्ऱ्याला धरून श्रावणी सांज उतरत होती.  राजांनी यमुनेच्या किनाऱ्याने ‘उत्तरेकडे’ हात उठविला. घोडी यमुनेच्या रोखाने दौडू लागली. यमुनाकाठ येताच घोडी थांबली. सगळे पायउतार झाले. त्र्यंबकपंतांनी बोचके सोडले. राजे आणि संभाजीराजे अंगीचे पेहराव उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले! यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांद घालत होती तिला हे दोन्ही ‘भुत्ये-संन्यासी’ काही बघायला मिळत नव्हते. उतरलेल्या पेहरावाचे पुन्हा बोचके आवळून त्र्यंबकपंतांनी ते , टाकले. सर्जराव आणि ते आपल्या, राजांच्या व संभाजीराजांच्या घोड्यांच्या ओठाळ्या धरून यमुनाकाठची मऊ वाळू तुडवीत काठाने उत्तरेकडे चालले. त्यांच्यात आणि आपल्यात थोडा फासला ठेवून राजे आणि संभाजीराजे यमुनेच्या काठची ओलवती वाळू तुडवू लागले. त्यांच्या पायठशांनिशी यमुनेच्या साक्षीने आता भवितव्याचे महाभारत उभे ठाकणार होते! मथुरेच्या रोखाने नौका नेणारा घाट आला. राजांनी त्र्यंबयकपंत आणि सर्जेराव यांची खांदाभेट घेतली.

घाटावर निराजी, कवींद्र परमानंद व कवी कुलेश यांच्यासह सिद्धच होते. न दिसणाऱ्या यमुनेच्या पात्राला राजे-संभाजीराजे यांनी नमस्कार केले आणि ते नौकेत चढले. पाठोपाठ निराजी वर चढले. नावाड्यांनी वल्ही पेलली. अंधाराला चिरत नौका पात्र तोडू लागली. पात्राच्या मध्यावर येताच राजांनी खांद्यावर चढविलेल्या झोळीत हात घातला. सोनमोहरांची भरली मूठ बाहेर काढून ती संभाजीराजांच्या हातात देत ते म्हणाले, “यमुनामाईला अर्पण करा.”

संभाजीराजांनी सोनमूठ यमुनेच्या कृष्णमुखात सोडली. या वेळी औरंगजेबाची लाल किल्ल्यातील मगरीबीची नमाज संपली होती! तो खुदातालाला भरल्या आभाळाकडे पंजे उठवून दर्बारी ‘पावती’ देत होता – “अर्र हम्मा निर्रहिम्म!”- ‘खरोखरच तुझ्यासारखा “दयाशील’ तू एकटाच आहेस!!’ त्याच दयेचा फायदा घेऊन कोठीत पलंगावर गिर्द्या, लोड रचून, राजांचा तबकातील टोपसुद्धा उचलून त्या जागी सरपोसाने झाकलेली “पाण्याची सुरई’ चढवून हिरोजी सिताब कोठीबाहेर पडला होता! मदारीने औषधे आणण्याच्या निमित्ताने केव्हा कोठीला पाठ दाखविली होती! सारे पक्षी उडाले होते! उरली होती पिसे! निर्दय कैदेच्या आठवणीची.

आपल्या हवेलीच्या देवमहालात रणचंडीसमोर माथा टेकून एक मानी रजपूत तिला साकडे घालीत होता – “मेहमान सलामत रहे!” तो होता रामसिंग! एक वास्तू आपल्या नावाला येणारा बट्टा टळला म्हणून यमुनेकडे बघत नि:श्वास टाकीत होती – ‘विठ्ठलदासाची हवेली!’

यमुनेवर लाटा उमटवीत नौका “किनाऱ्याकडे’ चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले एक आश्चर्य राजांनी शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले. “कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं?” क्षणभर यमुनेच्या उचंबळ्या लाटांनीही बाब ऐकायला आपली खळबळ रोखून धरली! राजांच्या पायांवर नजर टाकीत संभाजीराजे अदबीने म्हणाले, “डोकीवर टोप असल्यासारखेच चालत होतात तुम्ही आबासाहेब!!”

मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीधारी संन्यासी आणि बालसंन्यासी शिरले. पाठीशी निराजी होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजीपंत त्रिमल यांचे होते. निराजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजीपंत यांनी आपल्या थोर अतिथींचे उत्तरी दिललगाव पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला. घराच्या अतिथी सदरेवर अंथरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छाट्या धारण करून बसले होते. कुणाची नियती, कुणाला कुणाच्या दारात नि कसल्या रूपात उभे करील, सांगता येत नाही! वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे; पण आज तेच खुद्द संन्यासीवेषात दुसऱ्याच्या घरचे आतिथ्य घेत होते. आणि तेही एका मथथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून! राजे उसासले. छाटीधारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली –

“राजा हा जन्मानेच संन्यासी असतो! सारे सोडून संन्यासी होणे सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधुसंतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे! असेच व्हावे तुम्ही. वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी!’

त्रिमलांच्या घरची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळींशी खलबत केले. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्यावर आडवे झाले. संन्याशाला बिलगत बालसंन्यासी सुख झाला. तिकडे आग्ऱ्यात कल्लोळ उसळला होता! “सेवा गैब हो गया” ही खबर हां हां म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले!

“बेमुर्वत, निकलो यहांसे।” म्हणत फौलादखाँची शेलक्या शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हाकलला.

“वजीरे आझम, सेवाने कितने रुपिये नजर-निसार पेश किये थे?” औरंगजेबाने जाफरखानाला विचित्र कडवट सवाल टाकला.

“बाप-बेटेने मिलकर करीबन डेढ हजार मुहर और पंधरह हजार रुपिये नजर किये थे हुजूर!” जाफरखानाने जामदारखान्याचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले.

“उसे दर्बार आने के लिये खर्चा कितना दिया था?” औरंगजेबाच्या कपाळी आट्यांचे जाळे चढले.

“एक लाख रुपिया आलिजा!” जाफरखानाला सवालाचा रोख कळल्याने तो पडल्या आवाजात उत्तरला.

“नमकहराम, दगलबाज!” हिशोबातली तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुटपुटला. इकडे काखेच्या झोळीत, लाख-लाख रुपये किमतीचे हिरे, रत्ने, माणके दडवून राजे संभाजीराजांच्यासह मथुरेच्या वेशीबाहेर पडले होते. बैरागी, उदासी, भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथांचे वेष राजांच्या माणसांनी चढविले होते. वेगवेगळे ताफे करून एकमेकांशी संबंध राखत ते चालले होते, बनारसच्या रोखाने. चालीच्या वाटा दाखवायला स्वत: कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजी संगती होते.

दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतोड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होती. सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजीपंतांनी धुनी पेटवली. तिच्या फेराने राजे, संभाजीराजे, कृष्णाजी, कुलेश असे बैरागी बसले.

“सर्जेराव, किती पल्ला मागं पडला?” राजांनी धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेष घालून बसलेल्या सर्जेराव जेध्यांना विचारले.

“जी – असंल की धा कोसाचा.” सर्जेरावांनी उत्तर दिले.

“शवढाच?” राजांनी एक काटूक उचलून धुनीत घातले आणि संभाजीराजांकडे बघितले. ते धुनीत फुललेल्या निखाऱ्यांवर डोळे जोडून विचारात हरवले होते – ज्वालांच्या चटचटीबरोबर त्यांचा सूर लागून राहिला होता.

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६४.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment