महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,883

छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यदंड का देण्यात आला ?

By Discover Maharashtra Views: 1533 3 Min Read

छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यदंड का देण्यात आला ?

ज्यांना इतिहासातला इ देखील समजत नाही असे राजकारणी आणि त्यांची तळी उचलणारे नट वगैरे इतर महाभाग हल्ली छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्ये मध्ये धर्माचा काहीही संबंध नव्हता अशी बाष्कळ आणि धादांत खोटी विधानं करून समाजाची आणि विशेष करून हिंदूंची दिशाभूल करत असतात. खरं काय आहे ते समकालीन पुरावा दाखवून सांगणे हे इतिहास अभ्यासकाचे आद्य कर्तव्य आहे म्हणून हा लेख लिहीत आहे.(छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यदंड का देण्यात आला ?)

मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना कोणत्या कारणासाठी मृत्युदंड सुनावण्यात आला याची माहिती औरंगजेबाचा अधिकृत दरबारी इतिहास असलेल्या आणि साकी मुस्तैदखानाने लिहिलेल्या मआसिर-ई आलमगिरी या ग्रंथात मिळते.

छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेब याने काझींची एक समिती नियुक्त केली आणि संभाजी महाराजांना कोणती शिक्षा करावी याबद्दलचा अभिप्राय या समितीला देण्यास सांगितलं. तो अभिप्राय मआसिर-ई आलमगिरी या ग्रंथात नोंदलेला आहे आणि तो पुढील प्रमाणे आहे :-

फार्सी

व चूं इफ्नाए आन मुश्रीक-ई-बदकिश-ई जहन्नम नसीब दर बराबर-ई वबाल व नकाले की अज़ क़त्ल व इसर-ई मुस्लमानान व नहब व ग़ारत-ई-बिलाद-ई-इस्लाम बर इबकाए ऊ रुझान दाश्त। व ब-फ़तवाए अज़ बाब-ई शर व मिल्ल्त व सवाबदीद-ई असहाब-ई दीन व दौलत सफ़्क-ई दम-ई आन हर्बीए कती-ओततरीघ लाज़िम आमद बाद-ई वसूल-ई-मौकीब-ई जफरंजोल बिस्त व यकम-ई जमादिलावल सना सी व दो ब-कोरागाँव मुसम्मा ब-फ़तहबाद बिस्त व नहम शहर-ई मजकूर ब-वसातत-ई तेग़-ई-काफिरकोश बा कब कलस की ता हमा जा हमराहश बुद ब-दरक-ई असफ़ल फ़रो रफ़्त

काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त

मराठी

इस्लामी शहरे लुटून (नहब व ग़ारत-ई-बिलाद-ई-इस्लाम) व मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून (क़त्ल व इसर-ई मुस्लमानान) जे पाप या घाणेरड्या धर्माच्या (म्हणजे हिंदू धर्माच्या) आणि नरकात जाणेच ज्याच्या नशिबात आहे अशा या काफिराने (म्हणजे संभाजी महाराज – या सर्व शिव्या मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या आहेत) केले होते ते बघता, त्याला जिवंत ठेवण्याच्या कारणांवर विचार विमर्श झाला. शरीयावर (इस्लामी कायदा) आधारित फतव्याप्रमाणे, राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या युद्धखोर चोराला (कती-ओततरीघ) नरकात धाडणेच योग्य होईल असे ठरवले. त्यामुळे २१ जमाद-उल- अव्वल जुलूस ३२ ला बादशाहा कोरेगावला (ज्याला फतहबाद म्हणून ओळखले जाते ) आल्यावर, त्याला (म्हणजे संभाजी महाराजांना) कवी कलश याच्या समवेत, काफिरांना ठार मारणाऱ्या तलवारीच्या साह्याने सर्वात खोल अशा नरकात धाडले.

त्याच्या मृत्यूची तारीख ‘काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त’ म्हणजे काफिराचा मुलगा नरकात गेला या कालश्लेषाच्या साहयाने लिहिली गेली.

~ मआसिर-ई-आलमगिरी , मूळ फार्सी पृ.३२४-३२५

सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a Comment