सांग –
सांग हे शस्त्र भाला, विटा याच जातकुळीतलं. भाला व विटा यांचे फाळ हे बांबूत घट्ट बसवतात.पण सांगहे शस्त्र अखंडपणे लोखंडात घडवलेली असते.साधारण सांगची लांबी ६ ते ७ फुटापर्यंत असते. सांगचा मुख्य पुढचा भाग लांब निमुळता होत जाणारा अणुकुचिदार असतो.तो साधारण १८ ते २० इंच असतो. मागचा पायदना कडचा भाग पण टोकदार असतो. साधारण याची लांबी ९ इंच असते. शत्रूवर दोन्ही बाजूने अक्रमण करता येत.
युध्दात भाले व विटा पैक्षा वापर कमी असला तरी शिवकाळात सांग च्या पायदळाच्या फलटणी पण असायच्या. भाल्या सारखाच उपयोग असल्याने ते बाळगणारे पण तशे दिमतीचे सैनिक होते. ही पुर्णपणे लोखंडाची असल्याने वजनालाही जास्त असते. ती तोलून धरणे व युध्दकरणे सोपी गोष्ट नव्हती.
मुळात हे शस्त्र देवडी वरच आहे. देवडीवर , तट ,बुरुजावर सांग घेउन मावळे खडापाहरा देत. जर कोणी गडावर शिडी किवा दोर लाऊन चढायचा प्रयत्न केला तर या सांगेच्या साह्याने गडाच्या जांग्यातून त्याच्यावर मारा करत. युध्दा बरोबर या सांगशिकारीला पण वापरीत. रानडुक्करची शिकारी साठी सांगव बरची चा वापर केला जायचा बरची पण लोखंडाची आसते. ति जास्त शिकारी साठी वापरली जायची. याचे खास ‘बरचीबहाद्दूर’ असायचे.
सुंदर नक्षीकाम केलेले, सोन्याचांदीची कोप्तागीरी केलेल्या सांगसुध्दा संग्रहालयात पाहायला मिळतात. सांगेच्या जडणघडणात पण प्रकार पाहायला मिळतात. लोकांना फारस नावही माहीत नसलेल हे शस्त्र आता दुर्मिळ झाल आहे. सदर सांग साडेसहा फुटाची असून पुर्ण सांगवर कोरीव नक्षीकाम केल आहे. अशा कोरीव नक्षीकाम केलेल्या सांग महत्वाच्या व्यक्ती वापरीत असतील किवा स्व:ता जवळ बाळगीत असावे.
भाल्या पैक्षा सांगहातात आली तर त्याचा रुबाब काहीअौरच असेल.
संतोष मु चंदने, चिंचवड, पुणे