महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,603

संगमेश्वर मंदिर, सासवड

Views: 5135
1 Min Read

संगमेश्वर मंदिर, सासवड

सासवड हे पुण्याजवळचे छोटे शहर आहे आणि पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे. पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व चांबळी (भोगवती) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.संगमेश्वर मंदिर.

सासवड बसस्थानका पासून साधारण १ कि.मी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर आहे.

चांबळी (भोगवती) नदीच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पुल तयार केला आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुल ओलांडून गेल्यावर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात. दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा दृष्टिस पडतो.

सुरुवातीला बाहेरच पुरातन नंदी दिसतो. त्याच्या समोरच तीस दगडी खांबावर उभारलेला मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा आहेत. मंडपातील भव्य नंदी आहे. मंदिरातील भागात दगडी कासव आणि मंदिरावरील नक्षीकाम सुंदर आहे.

मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते.

मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळीच्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.


माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

Leave a Comment