महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,43,021

संगमेश्वर मंदिर सुपा, ता. पारनेर

By Discover Maharashtra Views: 40195 2 Min Read

संगमेश्वर मंदिर, सुपा, ता. पारनेर

नगर पुणे रस्त्यावरील सुपे हे ऐतिहासिक गाव मध्ययुगीन काळात जहागिरीचे गाव म्हणून ओळखलं जात असे. मराठयांच्या इतिहासात पुणे जिल्ह्यातील सुपे, चाकण, इंदापूरला जेवढे महत्त्व तेवढच नगर जिल्ह्यातील सुपे गावाला महत्त्व होते. या गावाला १६ व्या शतकाची उज्ज्वल परंपरा आहे. गावात नगर-पुणे हमरस्त्याच्या बाजूलाच उजव्या हाताला ऐतिहासिक सुंदर, संगमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.(संगमेश्वर मंदिर सुपा)

संगमेश्वराचे मंदिर दोन ओढयांच्या संगमावर बांधण्यात आले आहे. त्याचे संपुर्ण बांधकाम दगडी असून अतिशय रेखीव आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. मंदिरातील गाभाऱ्यात एक शिवलिंग व समोर चौथऱ्यावर रेखीव नंदी आहे. मंदिरावर पंचधातूचा साडेचार फूट उंचीचा मुख्य कळस व इतर छोटे-मोठे २६ कळस गतवर्षी बसविले आहेत. मंदिराच्या शेजारी एक सती मंदिरही आहे. समितीच्या वतीने याही मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे.

सुपे गावची वतनदारी शिवाजी महाराजांचे सरदार कृष्णाजी साबूसिंग पवार यांच्याकडे होती. कृष्णाजी पवार १६५९ पूर्वी येथे वास्तव्यास होते त्या काळात त्यांनी सुपे येथे गढी व एक शिवालय बांधले असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. या मंदिरासाठी लागणारा दगड अकोळनेर (ता. नगर) येथील डोंगरावरुन आणल्याचा उल्लेखही आढळतो. या मंदिरात सुपे येथील श्री संत हरिदास बाबा ध्यान करत असत, अशी माहिती गावकरी सांगतात. येथे प्रत्येक सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते, तर श्रावण महिन्यात दररोज गर्दी होत असते.

Rohan Gadekar

1 Comment