महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,40,797

सांगली संस्थान | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 2988 2 Min Read

सांगली संस्थान | बखर संस्थानांची –

मालक न समजता स्वताला सेवक समजून विश्वस्ताची भूमिका पार पाडणारे संस्थानिक म्हणजे सांगली चे पटवर्धन घराणे. नऊ तोफांच्या सलामीचे मान असलेले सांगली संस्थान. कोकणातून मिरजेला आलेले पटवर्धन घराणे मराठा साम्राज्यातील उच्चपदावरील सेनानी होते.त्यांनी मराठा साम्राज्याची दक्षिण सीमा तुंगभद्रे पर्यंत वाढवली. त्यामूळे तीन भावांना तिन वतन जहागिरीत मिळाले.

मिरज जहागिरीच्या वारसाहक्का वरुन गृहकलह वाढला .पेशव्यांनी मध्यस्थी करुन वाटण्या केल्या. यात सांगली ची मोठी कर्यात चिंतामणरावांना मिळाली.  चितामणांनी  मिरज सोडून सांगलीत १८०२ साली सांगलीचा कारभार चालू केला. सांगलीत गणेश पंचायतन मंदिर बांधले.सांगलीत त्यांनी खास बाजारपेठा वसवल्या व हळदीची खास बाजारपेठ बनवली. टांकसाळ ही सुरू केली. कलाकार कारागिरांना ,राजाश्रय दिला. चितामणरावांचे १८५१ ला निधन झाले.त्या नंतर त्यांचे पुत्र धुंडीराज ऊर्फ तात्यासाहेब गादीवर आले.त्यांचे निधन १९०१ साली झाले.ते निपुत्रिक असल्याने दत्तक त्यांनी त्याच घराण्यातील विनायक यास घेतले.त्यास चिंतामणराव द्वितीय म्हणून ओळखत.१९१० ला अधिकृत पणे कारभाराची सुत्रे घेतली.त्यांनी सांगली संस्थानची अर्थिक भरभराट केली.मुलुख एकसंध नसताना सुध्दा प्रशासन व्यवस्था उत्तम ठेवली.

८ मार्च १९४८ रोजी सांगली संस्थान भारतात विलीन झाले. पटवर्धन घराणे हे फार मोठे गणेश भक्त होते.मुळ पुरूष हरभट्ट यांनी एक तप गणेशसेवा केली. सांगलीतील गणेश पंचायतन त्यांच्या गणेशभक्तीची साक्ष देत सांगलीकरांच श्रध्द‍ास्थान ठरल आहे. त्यांच्या संस्थानाच्या स्टँप पेपर व कोर्ट फी वर सुध्दा गणेशाचे चित्र छापले आहे.

‘श्री गणपती महाराज पंचायतन तत्पर चिंतामणी धुंडीराव.’

संतोष मु चंदने. चिंचवड

Leave a Comment