संताजी राजेवाघ –
“पानिपत युध्दात भाऊंना वाचवण्यासाठी छातीचा कोट करणारा धारातीर्थी”
सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या फौजेचे सेनापती संताजी राजेवाघ हे महिदपुर परगण्यांचे जहागीरदार महिपतराव वाघापासुन त्यांना महिदपुर जहागीरीचे वतन प्राप्त झालेले.
काठापुर ता.आंबेगाव जि.पुणे येथील महिपतराव वाघ हे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या समवेत उत्तरेत गेले होते त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना महिदपुर परगण्यांची जहागीरी प्राप्त झाली होती महिपतरावांचे शुर पुत्र संताजी होळकर हे होळकर दरबारातील मोठे सरंजामी सरदार होते .
पानिपत युध्दासाठी जाणाऱ्या होळकर फौजेसाठी संताजी राजेवाघ यांनी सर्व हत्यारे तयार केले होते सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या फौजेचे नेतृत्व संताजी कडे होते पानिपत च्या कालाआम मैदानावर युध्द सुरू होताच संताजी अब्दालीच्या फौजेवर तुटून पडले संताजी च्या समशेरीला शत्रू सैन्यांच्या शेकडो सैनिकांचे रक्त लागले होते संताजी नी अब्दालीची बरीच फौज कापून काढली होती आवेशाने लढणाऱ्या संताजीना सुभेदार मल्हाररावांनी भाऊंच्या मदतीला पाठवले भाऊंना वाचवण्यासाठी संताजी नी शेकडो वार आपल्या छातीवर झेलले
रक्ताच्या शेवटच्या क्षणांपर्यत संताजी लढत होते मात्र ते भाऊंना वाचवण्या आधीच गतप्राण झाले भाऊंच्या पार्थीवावर संताजीचा रक्तबंबाळ देह अनेक जखमांनी पडलेला होता.
14 जानेवारी 1761 रोजी संताजी राजेवाघ कालाआम मैदानात वीरगतीस प्राप्त झाले संताजी राजेवाघ यांचे स्वतंत्र नाणे होते त्यांच्या नाण्यांवर सिहांचे चित्र मुद्रीत असुन होळकरांच्या मुख्य सरदारापैकी संताजीना नाणी पाडण्याचा अधिकारासह पालखी व हत्तीचा मान होता.आपला राजा पानिपत युध्दात धारातीर्थी पडल्याचे कळताच महिदपुर च्या जनतेने त्यांना राजा ही पदवी बहाल केली होती .संताजी वाघांची प्रतिकात्मक समाधी महिदपुर येथे असुन त्यांची कचेरी एका बारवात असायची त्या बारवेला आजही राजाबाघ की कुंजीताला बावडी म्हणतात तर त्यांचे सिहांचे चिन्ह बारवेवर कोरलेले पहायला मिळते.पानिपत बखर मध्ये युध्दात कामी आलेल्या सरदारांचा उल्लेख असुन त्यात संताजी च्या नावाचा उल्लेख आहे.या पानिपत युध्दात होळकरांचे अनेक सरदार कामीआले असुन यात संताजी राजेवाघ आणि पंचभैय्या सरदारातील पहिले मानकरी आनंदराव होळकरांचा समावेश आहे.
राजेवाघ घराण्यांचा किल्ला काठापुर गावात असुन तोफ,प्रवेश द्वारासह अनेक आठवणी व खाणाखुणा काठापुरकरांनी जपलेल्या आहेत. संताजीची समशेर त्यांच्या वंशजाकडे सुरक्षित असुन अज्ञात असलेल्या या वीरांच्या शौर्य कथा आजही महिदपुर भागात सांगितल्या जातात.आपल्या कर्तव्याशी इमानेइतबारे लढत लढत वीरगतीस हसता हसता सामोरे जाणाऱ्या थोर राजास त्रिवार अभिवादन…
(पानिपत मैदानावर एक आंब्यांचे झाड होते मराठ्यांच्या रक्ताचा सडा त्यांच्या आजुबाजुला पडल्यामुळे आंब्याच्या झाडाचे आंबे काळे झाले होते म्हणून त्या परिसराला कालाआम म्हणतात.)
– श्री.रामभाऊ लांडे
इतिहास संशोधक होळकर रियासत