उत्तर मराठा कालीन मातब्बर सरदार बाळोजी कुंजीर यांचे गाव वाघापूर!
उत्तर मराठा कालीन मातब्बर सरदार बाळोजी कुंजीर यांचे गाव वाघापूर. वाघापूर गावात आजही कुंजीर घराण्याचे वाडे आपल अस्तित्व टिकवून आहेत. भैरवनाथ मंदिरा समोर बाळोजी कुंजीर आणि कुंजीर घराण्याच्या इतर समाधी आहेत. या समाधी मधे दोन समाधी मंदिराचे घुमट असून हे दोन्ही घुमट सरदार बाळोजी आणि काळोजी कुंजीर यांचे आहेत असे सांगितले जाते . वाघापूर येथील भैरवनाथ मंदिर खूपच पुरातन आहे. मंदिराचा सभामंडप नवीन बांधला आहे. मंदिराच्या समोर एक आणि पाठीमागे एक विरगळ आणि एक देव प्रतिमा ठेवली आहे. वाघापूर येथे एक पुरातन बारव आपले अस्तित्व टिकवून आहे. बारव खूप सुंदर आहे.
वाघापूर बद्दल विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे कुंजीर परिवारास बाळोजी आणि काळोजी सरदारांचे वंशज असल्याचा खूप अभिमान आहे. मी वाघापूर रोडवर एका व्यक्तीला विचारले की सरदार बाळोजी कुंजीर यांचे वाघापूर हेच गाव आहे का. त्यांनी होय म्हणून सांगितले व काय काम आहे विचारले. मी सरदार बाळोजी कुंजीर यांचा घुमट पाहायला आलो आहे हा माझा उद्देश सांगितला . त्यांनी त्यांचे नाव बापू कुंजीर असे सांगितले व हातातील सर्व कामे सोडून संपूर्ण वाघापूर गावचा ऐतिहासिक परिसर फिरून दाखवला. कुंजीर घराण्याचे पुरातन ऐतिहासिक वाडे , मंदिरे, विरगळी, समाध्या, बारव आणि सरदार बाळोजी आणि काळोजी यांचे घुमट दाखवले. गावातील मान्यवरांच्या भेटी घालून दिल्या. वाघापूर मधील अशोक कुंजीर सर हे एक आदर्श व्यक्तिमत्व व कुंजीर घराण्याचे इतिहास अभ्यासक आणि संशोधक . अशोक सरानी कुंजीर घराण्याचा बराच इतिहास संशोधन केला आहे. अशोक सरानी केलेले संशोधन पुस्तक स्वरूपात प्रकाशित होने गरजेचे आहे.
टीप – सर्व कुंजीर परिवारास विनंती आहे की बाळोजी कुंजीर आणि इतर सरदारांचे समाधी मंदिर व समाधी परिसर स्वच्छता आणि संवर्धनासाठी आपली प्रतिक्षा करत आहे . कृपया आपला अमूल्य वेळ द्यावा.
धन्यवाद – Jeevan Kawade