समशेर बहाद्दर सरदार खंडेराव बर्गे –
मुळचे आदिलशाह चे मात्तबर असे, सातारा प्रांतातील वतनदार असलेले, सरदार येसाजी बर्गे युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील झाले. सरदारयेसाजी व त्यांचे वंशज यांनी स्वराज्यासाठी रक्त वाहिले, त्यातील एक खंडेराव बर्गे होते.
कोरेगाव सातारा येथील बर्गेघराणे हे छत्रपतींचे जुने विश्वासू सरदार होते जवळपास सर्व लढायांमध्ये यांचा पराक्रम चा उल्लेख सापडतो त्यामुळे महाराजांकडून बरेच जमिनी इनाम म्हणून यांना मिळाल्या समशेर बहाद्दर सरदार खंडेराव बर्गे यांनी १२ मार्च १७७३ रोजी राजधानी रायगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला छत्रपती महाराज यांनी ही जबाबदारी जुने विश्वासू लढवय्ये सरदार म्हणून खंडेरावयांचे वर सोपवली होती.. त्या बद्दल सातारा चे छत्रपती महाराज यांनी समशेर बहाद्दर हा खिताब दिला तसेच इनाम वतन त्यांना दिले…
मोहीम फत्ते झाले नंतर खंडेरावयांनी आपले कुलदैवत सिद्धनाथ, म्हसवड येथे मोठी घंटा अर्पण केली आज ही सदर घंटा सिद्धनाथ मंदिर मध्ये प्रवेश करताना पहावयास मिळते त्यावर दुर्मिळ “सरदार खंडेराव बर्गे” अशी कोरलेली अक्षरे दिसत आहेत.
फोटो माहिती साभार – विशाल बर्गे बारामती