सरदार कृष्णाजी सावंत | अपरिचित योद्धा –
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते मराठ्यांचे सैन्य नर्मदापार जावे आणि मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांच्या थरथराटाने दिल्लीश्वर हि हादरावा.शिवरायांच्या नंतर फक्त वीसच वर्षात त्यांचे हे स्वप्न “सरदार कृष्णाजी सावंत ” यांनी पूर्ण केले. १७०० च्या सुरवातीस कृष्णाजी सावंत १५ हजाराची फौज घेउन नर्मदा पार गेले. त्यांनी धमुनी गावाजवळच्या प्रदेशात धामधूम उडविली,मोठी खंडणी मिळवली.
सर्वप्रथम नर्मदेपार मराठा निशाण रोवण्याचा मान कृष्णाजी सावंत यांस जातो.
सातार्याजवळील प्रसिध अश्या पालीच्या खंडोबा मंदिर येथे कोटाच्या आतील बाजूस नैऋत्येस पूर्वाभिमुखी देवडी आहे, तेथे कृष्णाजींचे सुपुत्र सरदार अडोजी सावंत यांनी या पराक्रमाची आठवण म्हणून कृष्णाजींची मूर्ती येथे बसविली.
कधी पालीला गेलात तर या वीर योद्ध्याला नक्की भेट द्या !!!
चित्र – सरदारकृष्णाजी सावंत यांचे मंदिर,पाली