महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,917

सरदार सिदोजी निंबाळकर

By Discover Maharashtra Views: 4308 2 Min Read

सरदार सिदोजी निंबाळकर…

अत्यंत श्रीमंत अशा जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराजांना सोने, रूपे, हत्ती, घोडे व अगणित मालमत्ता सापडली.
या सर्व लुटीसह महाराज परत फिरले तेंव्हा मोगलांचे सरदार रणमस्तखान, आसफखान, जाबीतखान व केसरसिंग सरदारखान आणि दहा हजाराची फौज महाराजांच्या वर चालून आली. या मोगली सरदारांनी महाराजांना गाठून त्यांच्या वर कठीण प्रसंग आणला होता. सिदोजी नाईक निंबाळकर पंचहजारी सरदार महाराजांच्या सोबत होते.

यापूर्वी महाराजांनी मोगलांचे जुन्नर, अहमदनगर, सुरत, कारंजा ही शहरे लुटुन स्वराज्य कार्यासाठी संपत्ती आणली होती. त्या वेळी लुट आणताना महाराज कधी एवढे अडचणीत आले नव्हते. यावेळी मात्र त्यांना मोगल सरदार आणि त्यांच्या ताज्या दमाच्या फौजेशी सामना करायचा होता. महाराजांच्या सोबत असलेली मराठा फौज सततच्या दौडी मुळे दमलेली होती. अश्या प्रसंगी सिदोजी निंबाळकर यांनी मोगल सरदारांना थोपवून धरण्याचा मनसुबा महाराजांना बोलून दाखवला. त्या प्रमाणे चार पाच हजारांचे सैन्य घेऊन ते शत्रूला सामोरे गेले. काही निवडक सैन्य सिदोजी निंबाळकर यांना देऊन बाकीच्या सैन्यांच्या सह आणलेल्या लुटीसह शिवाजी महाराज पट्टा किल्ल्या कडे निघून गेले.

मोजक्या लोकांच्या मदतीने सिदोजी निंबाळकर यांनी मोगलांशी सतत तीन दिवस प्रखर झुंज दिली. शत्रूला थोपवून धरण्यात ते यशस्वी झाले. शिवाजी महाराज पट्टा किल्ल्यावर सुखरूप पोहचले. मात्र मोगलांच्या सैन्याला तोंड देत असताना सिदोजी निंबाळकर धारातीर्थी पडले. ही खबर ऐकून महाराजांना फार दुःख झाले.
याच पट्टा किल्ल्यावर संभाजी राजे मोगलांच्या तावडीतून सुटुन परत स्वराज्यात दाखल झाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज पट्टा किल्ल्यावर दाखल झाले व सरदार सिदोजी निंबाळकर धारातीर्थी पडले ती तारीख होती –
22 नोव्हेंबर 1679.

पोस्ट – रवि पार्वती शिवाजी मोरे

माहिती साभार – मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

बाजींद कांदबरी

Leave a Comment