सरदार यशवंतराव आनंदराव पवार –
पानिपतात विरगती प्राप्त झालेले सेनापती, धार संस्थानचे दुसरे अधिपती सरदार यशवंतराव आनंदराव पवार. माळव्या तील मराठी राज्याविस्तारात यांचा सहभाग होता.सन १७३४-३५ ची माळव्याची मोहिम,सन १७३६ मध्ये चिमाजी अप्पांसोबत वसईच्या मोहिमेतही ते आघाडीवर होते.त्याच साली आनंदरावांच्या निधनानंतर यशवंतरावांना सरंजामाची वस्त्रे देण्यात आली.
पुढेही पेशव्यांच्या अनेक मोहिमांत ते सहभागी होते. पानिपताच्या लढाईत ते आपल्या पंचवीस हजाराच्या फौजेसह विश्वासरावांकडच्या बाजूस होते.प्रत्यक्ष लढाईला सुरूवात होताच यशवंतरावांच्या तुकडीने अताईत खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला.
यशवंतरावांनी हत्तीच्या अंबारीतून तिरंदाजी करणाऱ्या अताईत खानावरच हल्ला करीत,त्याच्या हत्तीवर चढून त्याचं मस्तक धडावेगळं केलं.हा महाभारतीचा रणवीर तेव्हा रुधिराभिषिक्त भैरवंच भासत असावा. पुढे याच चकमकीत हे रणवीर धारातिर्थी पडले.
वंशपरंपरेनंच मिळालेला शौर्याचा वारसा यथोचित सांभाळत आपल्या यशवंत या नावाला साजेसाच पराक्रम गाजवला हेही तितकंच खरं.