सरकारवाडा..!
सरकारवाडा..! अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असणाऱ्या वांबोरी या माझ्या गावी असलेला सुमारे दोन एकर क्षेत्रावर गावाच्या मधोमध उभा असलेला हा भव्य सरकारवाडा..! सुमारे 25000 हून अधिक लोकसंख्या असलेलं आमचं वांबोरी हे गाव इथल्या ऐतिहासिक, पौराणिक आणि कित्येक शतके जुन्या व्यापारी बाजारपेठेच्या पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या नकाशावर पोहोचले आहे..! आमच्या बालपणापासून पाहत आलेली माझ्या गावातील ही सर्वात पुरातन वास्तू..! कित्येक पिढ्यांचा आणि ऐतिहासिक, राजकीय घडामोडींचा मूक साक्षीदार असलेला हा सरकारवाडा म्हणजे वांबोरीचे वैभवच म्हणता येईल..!
स्वातंत्र्यपूर्व काळात येथे अश्वशाळा होती. नव्वदीच्या दशकात जागेअभावी या वाड्याच्या काही भागात मुलींची शाळा सुरु करण्यात आली होती;त्यावेळी एकदोनदा त्याला आतून पाहण्याचा योग आला;परंतु या वाड्याविषयी गावांतील जाणत्या (?) मंडळींच्या तोंडून ऐकलेल्या काही गोष्टींतून या ठिकाणी असलेल्या गुप्तधनाच्या सुरक्षेसाठी एक फार भयंकर आणि हातभर लांब केस असलेल्या सर्पाचा या वाड्यात वावर असल्याने आत सहसा कुणीही जाण्याची हिंमत करीत नाही अशी चर्चा नेहमीच ऐकायचो..(ही फार तर अफवा म्हणूयात).एकेकाळी दिमाखात उभ्या असलेल्या या राजेशाही वास्तूच्या नशिबी मात्र त्याला खेटून झालेली हल्ली
माझ्या मनात मात्र या सरकार वाड्याविषयी प्रचंड कुतूहल आहे..याचा निर्माता कोण..?कोणत्या कारणास्तव सरकार वाडा बांधला असावा..?सरकारवाडा या नावामागचा इतिहास काय असावा..असे एक ना अनेक प्रश्न मला नेहमीच पडतात..आणि दुसरीकडे कित्येक शतके ऊन-वारा-पावसाचे आणि काळाच्या परिस्थितीचे तडाखे सोसूनही परंतु आत वाढलेले मनुष्याच्या उंचीचे दाट गवत आणि कमालीचा एकांत यामुळे गावाच्या मध्यभागी असूनही हा वाडा एक शापित आणि दुर्लक्षित वास्तू ठरला आहे..!
आदिनाथ मोरे,वांबोरी 9921464055