सावदा पाटील वाडा –
सावदा येथील एक अजून अनोखी रचना म्हणजे पाटीलवाडा हा आहे. तीन वेगळ्या इमारती आहेत, ज्या पाटील कुटूंबियांच्या मालकीच्या आहेत, त्यापैकी एका वाड्याला मी भेट दिली. तो म्हणजे बाबा पाटील किंवा बी. डी. पाटील वाडा. बाबा पाटील. हे बी.डी पाटीलांचे लोकप्रिय नाव आहे. (रावसाहेब, भिका दुर्गा पाटील) हा वाडा प्रमाणे मराठाकालीन वास्तुकलांचा प्रभावासारखा दिसतो. अतिथी व परदेशी पाहुण्यांसाठी जवळजवळ पंधरा खोल्या आहेत.
ह्याशिवाय दारे, खिडक्या, बाल्कनीतील कमानी व्हरांडे, मूलभूत लाकडी चोकटींची कामे आहेत. मध्ये दिसते ती कमान उत्कृष्ट लाकडी कलेचा नमुना व सजावट आहे. मध्ये तपशीलवार रचना पाहता येते. देवघर हे सर्वसाधारण खोली आहे. जेथे सर्व कुटुंबीय दरवर्षी एकत्र येतात आणि धार्मिक विधी व पारंपारिक पूजा करतात. दुस-या मजल्यावर व्हरांडा आणि लांब सज्जा हे उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमूना आहे. कलात्मकता वाढवणारे मध्ये दिसत आहे.
बागेत कृष्णाचा चमत्कार म्हणून ओळखल्या जाणा-या दगडी पाट्यासारख्या वाटणारी मूर्ती आहेत. फर्निचर आणि हस्तकला संकलन ह्यातून सौंदर्यानुभव, समृद्धता दिसते. बाबा पाटीलांकडे वाद्यांचे व संगीत साधनांचे संकलन आहे. ते उर्दू गझलचे एक उत्तम गायक आहेत. लहान चांदीच्या प्लेटवर देवनागरी मधील देणगीची शिलालेख लिहीलेली चांदीच्या चौकट मोडलेल्या तुकड्यांमधे आहे.