निर्सगाच्या कुशीतील शनेश्वर धाम –
नागपूर शहरापासून भटकंती करायाची असेल तर बुटीबोरी ते उमरेड रोड वर असलेले शनेश्वर धाम हा पर्याय अत्यंत सोपा आणि सहज ठरेल. शनेश्वर धाम येथे विशाल शनिदेव मंदिर आहे. सुमारे 20 फूट उंची असलेल्या या पुतळ्याला लाकडापासून बनवलेले आहे.
मंदिर आवारात विविध देवतांची २१ अतिरिक्त मंदिरे आहेत. बुटीबोरी ते उमरेडच्या दिशेने सुमारे 10 कि.मी. अंतरावर शनेश्वरधाम आहे. हे मंदिर नागपूर झिरो माईलपासून 40 कि.मी. अंतरावर आहे. स्व. माणिकराव दयारामजी वैद यांनी या मंदिराची स्थापना केली होती.
निसर्गाने कुशीत घेतलंय असे वाटणारे वृक्षांनी बहरलेले डोंगर, आणि मुकूटमणीसारखे असलेले शनेश्वरधाम मंदिर. येथे आल्यावर मंदिराचे दर्शन तर होतंच, त्याहून अधिक विलोभनिय निसर्गाच्या सौंदर्यामुळे एक प्रकारची आत्मिक शांतता, समृध्दता अनुभवता येते. येथूनच 4 ते 5 किमी अंतरावर वडगाव अर्थात रामा हे नागपूर शहराजवळील सर्वात मोठे धरण आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गाने भरलेला व एक दिवसीय सहलीचा उत्तम पर्याय आहे.
माहिती – अभिनव फटिंग
Photo – @aapla_nagpur