शंकरराव झुंजारराव ह्यांचा वाडा, नेवाळपाडा, मुरबाड –
गेल्या शतकात कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ठळक व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे शंकरराव झुंजारराव. या ऐतिहासिक शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आता महापालिकेचे मुख्यालय ज्या ठिकाणी आहे तो शंकरराव चौक त्यांच्याच नावाने ओळखला जातो शिवाजी चौक परिसरातील भाजी मंडईसुद्धा झुंजारराव मार्केट म्हणून ओळखली जाते झुंजारराव कुटुंबीयांचे मूळ गाव मुरबाड मध्ये आहे तेथील नेवाळपाडा येथील १८ व्या शतकातील भव्य शंकरराव झुंजारराव ह्यांचा वाडा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अजूनही शेवटचा घटका मोजत उभा आहे.
कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर मुरबाड, सरळगाव अशी अनुक्रमे गावे पार करीत तब्बल ४५ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपण ‘नेवाळपाडा’ परिसरात येऊन पोहोचतो कल्याण ते नेवाळपाडा अंतर कापण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ चा वापर करावा लागतो इतर रस्त्यांच्या तुलनेत हा उत्तम दर्जाचा रस्ता चटकन नजरेत भरतो त्यावरून प्रवास करताना अजिबात थकवा जाणवत नाही नेवाळपाडा परिसरात पोहोचल्यानंतर एक भव्य वाडा आपल्या नजरेस पडतो आजुबाजूला असलेल्या आधुनिक बंगल्यांच्या गर्तेत सापडलेला हा १८ व्या शतकातील भव्य वाडा आपल्याला मोहून टाकल्याखेरीज राहात नाही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या झुंजारराव कुटुंबाचा हा वाडा आहे कल्याणचे पहिलेवहिले नगराध्यक्ष दिवंगत शंकरराव झुंजारराव यांचा हा वाडा आहे.
वाड्यातील चौकातून पुढे आल्यानंतर ओटीचा भाग आपल्या निदर्शनास पडतो ओटीच्या या परिसरात दोन कोनाडेही पाहायला मिळतात या कोनाडयांच्या अगदी वर निराळ्याच प्रकारचे चित्र दिसते एका कोनाड्याच्यावर चंद्र तर दुसऱ्या कोनाडय़ावर सूर्यासारखे चित्र पाहायला मिळते संपूर्ण वाड्याचे बांधकाम लाकडी असून आज वाड्यात शिसवी टेबल, कुंकवाची लाकडी पेटी, पानाचा पितळी डबा, गंध उगळायची लाकडी सहाण, लाकडी डेस्क, अंघोळीसाठी वापरात येणारे घंगाळे, सामान ठेवण्यासाठी असणारा पेटारा आदी जुन्या गोष्टी पाहायला मिळतात.
Vishal Vaidya