संताजीच्या नावाची धास्ती आणि आलमगीर बादशहा
शिवछञपतींच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सुञे तरूण नवख्या 22/23 शितल्या पोरंनं संभाळली . औरंगजेबासारख्या मुसद्दि आणि कपटी धुर्त अश्या बादशहास आपल्या मनगटाच्या आणि बुद्धिच्या बळावर मात करत अखेर नऊवर्षांच्या लढ्यानंतर संभाजी महाराज शञूच्या कचाट्यात पडले औरंग्याला झालेला ञास यामुळे त्याने संभाजी महाराज यांना फार क्रुरपणे मारले संभाजी महाराज यांचा मृत्यू पाहून मराठे हतबल होतील असे बादशहास वाटत होते पण स्वराज्याची सुञे राजाराम महाराज यांच्या हाती पडली सेनापती म्हणून संताजी घोरपडेंची नेमणूक केली आणि संताजी आणि धनाजींनी बादशहास मराठे काय आहेत हे दाखवून द्यायचे होते धनाजींनी फलटणनजीक उघड्या मैदानावर चार पाच मोठ्या लढाया दिल्या आणि संताजीने औरंगजेबाच्या गुलालबारी तंबूवरच हल्ला चढविला पण बादशहा उपस्थित नसल्याने वाचले सपासप वार करून कापाकापी करून अख्या तंबूच लुटून पन्हाळी छञपतींसमोर पेश केला संताजीच्या या मोहिमेने औरंगजेबाला धास्ती लागून राहिली होती.
संताजीचा मोडकरण्यासाठी अनेक बडे बडे उमराव वजीर सरदार एका सेनापतीवर त्याच्याबरोबरीचे चार पाच सरदार जरी धाडले तरी संताजी आणि धनाजी यांचा मोड करीत होते.
संताजीच्या नावाची धास्ती
संताजी हे थोरल्या स्वामींच्या पश्चात चार पाच मोहिमा केल्या होत्या . मोहिमांमध्ये घेतली जाणारी दक्षता गुप्तता आणि जबाबदारी सर्व अनुभव घेतलेला सेनापती संताजी होय . जालना मोहिमेत संताजी आणि मोरे यांच्याकडून थोडीशी चूक झाल्यावर छञपतींनी नाराजी झाली होती. संताजींनी मोहीमेत लहानात लहान झालेली चूक मोहिमेत अपयश घडवू शकते त्यामुळे संताजीपाशी असलेली फौज अतिशय काटेकोर व शिस्तीची होती . संताजींचे हेर ही आपली कामगिरी अतिशय चोख बजावत होते त्यामुळेच संताजींचा दबदबा फौजेवर असल्याने प्रत्येक मोहिमेत यशस्वी होतं असे .
छञपती संभाजी महाराज यांना पकडणारा शेख निजाम याला ही संताजीने निकराची लढाई दिली तुंबळ युध्द झाले संताजीच्या काव्यासमोर निजामाने पिछेहट केली पण त्याचा चांगलाच मोड केला ” धन्यास धरणार्या ” या तांब्रास असा धडा शिकवला की तो पुढे रणभूमीवर आढळला नाही.
शिवछञपतींनी राजधानी म्हणून 1662 साली रायगड निवडला त्याच रायगडास संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर झुल्फिकरखानाने जिंकून घेऊन त्याने 1692/93 साली दोनवर्षांपासून जिंजीस वेढा दिला होता आलमगीर वजीर आसदखान ही होता पण धनाजी आणि संताजींच्या हल्याने आणि विशेष संताजीने वेढ्यास पोचणारी रसदच नेहमी लुटल्याने वेढा माघारी घ्यावा लागला होता मोगली गोटात रसद न मिळाल्याने सैन्यात अस्ताव्यस्त झाले होते खानाने छञपतींच्या मदतीने वेढा उठवून सैन्य वांदिवाशात नेले हा निर्णय संताजीस मान्य नव्हता शञू ऐकाकी पडल्यास त्यास संपवावा असे मत सेनापतीचे होते पण छञपतींनी तोवर मदत केली होती.
पुढे असेच खटके 1695/96 पर्यंत होतच राहिले तरीही संताजी शञूगोटात गेले नाहीत पण सेनापती पदावरून काढले तरीही ते आपला शिक्का सेनापती पदाचाच समजून शञूस उपद्रव देत राहिले होते.
संताजीच्या नावाची धास्ती
या 1689 ते 1700 काळात संताजी हे नाव औरंगजेबास रोज रोज ना ईलाजाने ऐकावे लागतं होते या काळात मराठे सरदार शञूंकडे जात येत होते हे संताजीस मान्य नव्हते. असेच अमृतराव निंबाळकर करीत होते (कोसेगावचे निंबाळकर) राजाराम महाराज यांनी संताजीवर मोहीम आखली आणि धनाजी जाधवराव सेनापती झाले धनाजींचे सरदार अमृतराव होते आयवरकुट्टी येथे घमासान युद्ध झाले मराठी दौलतीसाठी योग्य नव्हते पण परीस्थिती अशीच ओढावली होती संताजीसमोर राजाराम महाराज आणि धनाजींचा ही निभाव लागला नाही संताजीच्या हातून धनाजीराव कसेबसे आपला जीव वाचवून निसटले पण छञपती व अमृतराव सापडले अमृतरावांच्या ये जा करण्यामुळे संताजीने त्यांस ठार केले छञपतींना दुसरे दिवशी सोडून दिले .
संताजीच्या फौजेतील प्रत्येक सरदारांस छञपतींनी आपल्या निष्ठेची पञे धाडून संताजीस एकाकी केले तरीही संताजी शञूस झुंजत होते. ते 1697 साली देशी आले पण हणमंतराव निंबाळकर यांच्याकडून कोसेगावी पराभव झाला ते महादेव डोंगरांगी निसटले शञूंच्या फौजांनी ही घेरले होते पण संताजीच्या समोरासमोर लढण्याईतपत बळ राहिले नव्हते पण नागोजीच्या पत्नीमुळे आणि बादशहाच्या इतराजीसाठी नागोजीने संताजीस निशस्ञ अंघोळीस असताना ठार केले . संताजीच्या मृत्यू ने खरेतर मराठी दौलतीस मोठे नूकसान झाले होते .
संताजीचा मृत्यू झाल्याची बातमी याकुतने आणल्यावर बादशहा इतका खुष झाला की त्याने खुशखबरखान अशी पदवी दिली . ही पदवी 1660 ते 1707 या संपुर्ण कारकिर्दीत बादशाहने फक्त याकुतलाच का दिली ?
औरंगजेबाने त्याच्यासमोर येणार्या प्रत्येक शञूला ठार केले किंवा करवून घेतले पण कोणालाच अशी पदवी दिलेली नोंद नाही.
औरंगजेब बादशहा होण्यासाठी भाऊ दाराशेको आणि बाप शहाजहान हे बादशहाचे कट्टर वैरी होते. ही लढाई तख्तासाठी फार महत्वाची होती . या लढाईत दाराशेकोचा पराभव झाला 1659 रोजी भावाला कैद झाली आणि बादशहाच्या फर्मानावरून अमानुषपणे हत्या करण्यात आली हा वध नजरकुलीच्या हस्ते झाला वधाची खाञी म्हणून दराशेकोचे मुंडके बादशहा समोर आणावे लागले या कृत्याबद्दल फार मोठे समाधान झाले पण अशी पदवी कोणालाच दिली नाही . 1660 बाप शहाजहाचा मृत्यू आग्र्यात झाला त्याच्या वाटेत येणारा शेवटचा बापही गेल्याने तो फार संतोष पावला पण असे कोणते पदवी बक्षीस कोणाला नाही दिले .
संताजीच्या नावाची धास्ती
दाराशेको आणि शहाजहान यांच्या मृत्यूखबरांपेक्षा ही फार ञासदायक ठरलेला संताजीच्या खबरेवर खाकूतास खुशखबरखान अशी पदवी देण्यात आली आणि बक्षिसे ही दिली गेली .
नागोजी बादशहाकडे जाण्यास संधी हुडकतच होता ती संधी संताजीच्या हत्येमुळे प्राप्त झाली होती संताजीचे शीर सरदाराबरोबर पाठवून नागोजीचे गुन्हे माफ करण्याचा फर्मान घेऊन ब्रम्हापूरी शीर घेऊन हजर केले संताजीचे शीर पहाताच औरंगजेब उठून संतोषरूपी शीर पाहून त्याने भाल्य्वर लटकवून छावणीत मिरवायला लावले आणि नागोजीचे गुन्हे माफ केले आणि दरबारातील अटि नियम असतात त्यातूनही नागोजीची सुटका झाली.
गुन्ह्याची क्षमा करणे हे त्याच्या स्वभावातच नव्हते तरीही नागोजीस त्याने माफ केले ही सामन्य गोष्ट नव्हे इथूनच संताजीच्या नावाचा पराक्रम लक्षात येतो.
स्वतःहाचा मुलगा शहाजादा सुलतान यास संशयावरून मारून टाकले आणि त्यांच्या मुली काही वर्षांनी दरबारी आल्यावर बादशाहाने फार प्रेमाने वाढवल्या पण एक दिवशी मुलींनी प्रश्न विचारला आजोबास तुम्ही वडीलांना एवढी क्रुर शिक्षा का केली यावर औरंगजेब सुन्न होऊन हाती खंजीर घेऊन चराचरा गळा चिरून हत्या केली. जर औरंगजेब अशा कीरकोळ संशयावरून नातींचा खुन करणारा औरंगजेब जेव्हा बंडाळी करणार्या नागोजीस त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्यास दरबारात नियमांत ही न राहण्याची फर्माने देतो यावरूनच समजून येते की संताजीच्या मृत्यूमुळे त्यास कीती प्रकारे समाधान झाले असावे .
संताजीच्या नावाची धास्ती
संताजीच्या मृत्यूमुळे खरंतर मराठी दौलतीचे कधीच न भरून येणारे नूकसान झाले होते हे अवघ्या दोन महिन्याच्या परीस्थितीवरून दिसून येते डिसेंबर 1697 साली जिंजी झुल्फिकरखानास द्यावी लागली यावरूनच समजून येते.
त्यांच्या मृत्यूमुळे स्वराज्याचे फार नूकसान झाले होते 1694 ते 1699 सालांत औरंगजेब ब्रम्हापूरी छावणीत दडून बसला होता ते फक्त संताजी घोरपडेंमुळेच पण 1699 साली औरंगजेब स्वतः हा मोहिमेवर निघाला त्याने वसंतगड सातारा परळी या किल्ल्यांकडे लक्ष वळवले पण यापुढे ही धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली फौजा बळावल्या होत्या सेनापती झुल्फिकरखानास दमछाक होईपर्यंत मराठ्यांनी पळविले आणि औरंगजेब इथे किल्ले घेण्यात गुंतला होता ताराराणीच्या फौजातील कृष्णाजी पवार आणि नेमाजी शिंदे यांनी नर्मदापार होऊन बादशाही मुलखात धुमाकूळ घातला होता.
स्वराज्य रक्षणासाठी अनेकांनी प्राणाच्या आहूत्या दिल्या त्यात संताजींनी आधी धास्ती निर्माण करून मोगलांची पायपीट केलीच पण त्यांना दक्षिणेत आणि देशात गाडणारा वीर पराक्रमी संताजी घोरपडेंचा मृत्यू नेहमी मनात एक खंत निर्माण करून जातो .
#रणझूंजार
#सेनापती
#ममलकत_मदार