महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,851

शरभ शिल्प

By Discover Maharashtra Views: 2090 2 Min Read

शरभ शिल्प –

आपल्या आजूबाजूला असलेल्या बहुतांश मंदिरे, किल्ले यांचा द्वारावर किव्हा बाह्यभिंतीवर आढळणारा विक्राळ  चेहऱ्याचा पायामध्ये तसेच शेपटी मध्ये हत्ती पकडलेला प्राणी म्हणजे शरभ होय.शरभ शिल्प.

हिंदू पुराणाप्रमाणे भगवान शिवाचा भक्त असणारया हिरण्यकश्यपूचा भगवान विष्णू नि नरसिंह अवतार घेऊन वध केला. मात्र क्रोधीत झालेला नरसिंह त्यानंतर जनतेला त्रास देऊ लागल्याने . भगवान शंकरांनी शरभाचा अवतार घेऊन या नरसिंहचा वध केला. अशी कथा सांगण्यात येते.

भगवान शंकराचे अर्ध मनुष्य व अर्धप्राणी रूप म्हणजे शरभ  होय.शरभपनिषिद हे उपनिषीद हे याच शरभावर आहे.मुरुडचा जंजिरा  हा सिद्दी हा मुस्लिम किंव्हा अफगाणिनि ने बांधलेला, किल्ले शिवनेरी हा सुद्धा १७५० पर्यंत मराठांच्या ताब्यात आलेला न्हवता, असे असताना या दोन्ही गडांवर सापडणारे शरभ शिल्प बघता ही संकल्पना धर्माचा चौकटी बाहेर जाऊन स्वीकारली गेली असावी असे वाटते.

हत्ती,वाघ यांना पायाखाली दाबून धरणारा, कधी एखाद्या गंडभेरुडाच्या चोचीमध्ये अथवा पायाखाली अडकलेला ,कधी पंख असलेला तर कधी ना पंख ना हत्ती धरलेला असा एकटाच शरभ.  असे अनेक प्रकारे शरभशिल्प पाहायला भेटतात.

दुर्गराज रायगडावर असे जवळपास ७ शरभशिल्प आहेत सोबत शिवनेरी लोहगड सिंहगड प्रतापगड रोहिडा पुरंदर अजिंक्यतारा  पन्हाळा असे अनेक किल्ल्यांवर शरभशिल्प पहावयास मिळतात ,सोबतच महाराष्ट्रातील अनेक मंदीरचा  बाह्य भिंतीवर शरभशिल्प पहावयास मिळते.

‘कामिकागम’, ‘उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत.फायदे दिलेले आहेत.

– श्रद्धा हांडे

Leave a Comment