रूसलेली पार्वती आणि शांत शिव –
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या बाजूला शिव मंदिराच्या मंडोवरावर हे अतिशय वेगळं मनोज्ञ असं रूसलेली पार्वती आणि शांत शिव शिल्प आहे. डमरूआणि नाग दोन हातात असून पायाशी नंदी आहे, गळ्यातही नागबंध आहे. त्यावरून हा शिव आहे हे स्पष्ट होते. पार्वती डोळ्यात काजळ भरत आहे. तिच्या दूसर्या हातात आरसा आहे. लक्ष वेधण्यासाठी शिवाच्या डाव्या हातात दंडासारखे दिसणारे जे आयुध आहे त्याला पार्वतीने आपला उजवा पाय लावला आहे. शिवाच्या उजव्या खालच्या हातात बीजपुरक आहे.
हे शिल्प अलीकडच्या काळातले असल्याने फारसे बारीक नक्षीकाम त्यावर आढळून येत नाही. पार्वतीचे वस्त्र, त्याचा मागे दाखवलेला पदर सुंदर आहे. साधेच पण प्रमाणबद्ध आकर्षक असे हे शिल्प. यात कुठला पौराणीक संदर्भ न दाखवता नवरा बायकोच्या नात्यातील सहज भाव दाखवला म्हणून वेगळे उठून दिसते.
गौरी रूसली असं म्हणण्यापेक्षा शिवच रूसला आहे आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी खालील ओळीतील भावना पार्वती व्यक्त करत आहे.
दर्पण देखू रुप निहारु
और सोला सिंगार करू
फेर नजरीया बैठा बैरी
कैसे अखिया चार करू
(प्रसन्न माळेकर या मित्राने सुचवलेल्या समर्पक ओळी)
नाशिकचे मित्र Ashok Darke यांनी हा फोटो पाठवला.
असे शिल्प कुठे आढळत नाही. याचा काही वेगळा संदर्भ असेल तर तज्ज्ञांनी विषद करून सांगावा. एरव्ही सामान्य दर्शकांसाठी “तूम रूठी रहो मै मनाता रहू” असं एका ओळीत रूसलेली पार्वती या शिल्पाचे वर्णन करता येईल. देव असला म्हणून काय झालं आहेत तर नवरा बायकोच ना..
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद.
(तूम्हाला आढळलेल्या शिल्पांचे फोटो पाठवा. )