शिव पार्वती पाणीग्रहण –
कैलास लेणं हे केवळ अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले आहे, वास्तुशास्त्राचा अद्वितिय नमुना आहे इतकंच नव्हे. तर या लेण्यात संस्कृतीक चालीरिती कोरलेल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी आजही सनातन पद्धतीने जो विविहसोहळा पार पडतो त्यात “पाणीग्रहण” असा विधी आहे. तेराशे चौदाशे वर्षांपूर्वी कोरलेल्या या लेण्यांत हाच विधी अशाच पद्धतीने शिव पार्वती पाणीग्रहण शिल्पांकित केला आहे.
हा प्रसंग शिव पार्वती विवाह सोहळ्याचा आहे. शिवाचा डावा हात पार्वतीच्या उजव्या खांद्यावर आहे. उजवा हात हातात घेतला आहे. पार्वती सलज्ज अशी जराशी मान खाली झुकवून उभी आहे. दोघेही ललित मुद्रते सहजतेने उभे आहेत. सुख दू:खात हीला सोबत घेवून धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरूषार्थ मी प्राप्त करेन, हीला सुखात ठेवेन, ही माझी सहधर्मचारीणी आहे अशा आशयाचे हे संस्कृत मंत्र आहेत. हे आजही उच्चारले जातात.
शिव पार्वती जसे उभे आहेत अगदी तसेच आजही जोडप्याला उभे केले जाते. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते. म्हणूनच तीला “वामांगी” असा शब्द आहे. उजव्या बाजूला आई, बहिण, मुलगी, सुन अथवा पुरूषाची शक्ती दर्शविलेली असते.म्हणूनच तीला “वामांगी” असा शब्द आहे. उजव्या बाजूला आई, बहिण, मुलगी, सुन अथवा पुरूषाची शक्ती दर्शविलेली असते. खाली ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. जे की या विवाह सोहळ्याचे पौराहित्य करत होते. कैलास लेणे या दृष्टीनेही पहायला पाहिजे.कैलास लेणे या दृष्टीनेही पहायला पाहिजे.
छायाचित्र Travel Baba Voyage.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद,