महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,23,406

प्राचीन शिवमंदिर, ब्राम्हणी

By Discover Maharashtra Views: 1331 1 Min Read

प्राचीन शिवमंदिर, ब्राम्हणी, ता. राहुरी –

नगर शहरापासून डोंगरगण – वांबोरी घाटमार्गे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले ब्राम्हणी हे सुंदर गाव. अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला तो या ब्राम्हणी गावात. याच ब्राह्मणी गावात गेल्यावर एसटी स्टँड समोरून काही अंतरावर चालत गेल्यास उजव्या बाजूला एक पुरातन शिवमंदिर आपल्या नजरेस पडते. या मंदिराचा कळस कोसळला असून मंदिराला रंगरंगोटी केल्याने त्याच्या मूळ सौंदर्याला बाधा आली आहे. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना असून गर्भगृहात शिवपिंड आहे.

सभामंडपाची द्वारशाखा सुंदर शिल्पं कामाने अलंकृत असून द्वारशाखेसमोर नंदी विराजमान आहे. या मंदीराच्या परिसरातच भग्न नंदी, अनेक वीरगळ आणि काही मुर्त्या आपल्याला पाहता येतात, यांचे नीट जतन करणे गरजेचे आहे.

Rohan Gadekar

Leave a Comment