महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,48,054

शिवमंदिर, मोरगाव, ता. बारामती

By Discover Maharashtra Views: 1330 2 Min Read

शिवमंदिर, मोरगाव, ता. बारामती –

मोेरगाव म्हंटल की प्रथम नजरेसमोर येत ते अष्टविनायकातील मयुरेश्वर गणपती मंदिर. पण या मंदिराच्या जवळच अस एक शिवमंदिर मोरगाव आहे की जे कायम उपेक्षित राहील आहे. आपण जो पर्यंत मळलेली वाट सोडत नाही तो पर्यंत गावाच्या अंतरंगाची समृध्दी नजरेस पडणार नाही.

मोरगावच्या गणपती जवळ सुंदर अस एक शिल्पांकीत मंदिर असून त्यावरील शिल्प व मंदिराची  वास्तुरचना आपले लक्ष वेधून घेते. भव्य दगडी सभामंडप व त्या प्रवेशद्वारावरील शिल्प व वेलबुट्टीच नाजूकपणा दिसतो तसेच छत छत तोलून धरणारे आठ विष्णु,  गाभारा वरील गणपतीसह शरभ हे नजरेतून सुटत नाही.

गाभा-यातील शिवलिंग हे उच्चप्रतीच्या पाषाणा पासून बनवले आहे. नंदीचे वेगळपणा व द्वारावरील गणपती जवळील शरभशिल्प तर  अप्रतिम.

देवळात गेल्यावर देखल्या देवाला दंडवत न घालता त्या मंदिरावरील आनेक गोष्टी शिल्प रुपात किवा चित्र रुपात आपल्याशी बोलण्यासाठी तयार असतात त्यांना बोलत केल तर मंदिराच्या अांतरंगातील गुपीत समजायला वेळ लागत नाही.

पांढ-या महादेव मंदिरा जवळ. रोडच्या बाजूला ग्रामदैवताच मंदिर च्या जवळ आणखी एक मंदिर पाहायला मिळते त्यात देखील एक मूर्ती पाहायला मिळते. तसेच गावात अस्ताव्यस्त व दुर्लक्षित घाणे आहेत. “कोलू घाणे” च्या अगोदरचे  हे घाणे आहेत. या घाण्यात साचलेले तेल कापडाने पिळून काढले जाते. फार अगोदरचा प्रकारातील हे तीन घाणे आहेत. दुसरा चुन्याचा घाण्याच चाक. जमिनीत गाडला गेला आहे. ह्या सर्व ठेवी अनमोल असून चांगल्या कंडीशन मध्ये आहेत. संर्वधनाची गरज नाहीतर नष्ट होण्यास वेळ नाही लागणार.

संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a Comment