शिव आणि विष्णू मंदिर, सातगाव भुसारी, बुलढाणा –
बुलढाणा जिल्ह्यातील सातगाव भुसारी येथील प्राचीन विष्णू आणि शिव मंदिर बुलढाणा पासून २२ किलोमीटर वर असणारे हे मंदिर पुरातन आहे. सातगाव भुसारी येथील गावाच्या खालच्या बाजूस एकूण सात ७ मंदिरे होती, सध्या तिथे तीन ३ मंदिरे उरली आहेत. त्या वरील अत्यंत सुंदर नक्षी काम व कोरीव काम बघून हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे मंदिर आहे समजते.
सध्या असल्येल्या ३ मंदिरां पैकी एक महादेवाचे आहे तर दुसरे विष्णू चे मंदिर आहे आणि तिसरे हे त्या मंदिराला बघून हे स्नान गृह असल्या चे दिसून येते .
दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत व त्याच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. पण या मंदिर कडे लोकांनी दुर्लक्ष केलय.
या मंदिराची पहाणी करताना लक्षात आले कि दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसवलेले आहे. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध आजची उभी आहे .
मंदिरावरील शिल्प अत्यंत कोरीव आहेत मंदिराची डावी बाजू काही प्रमाणात ढासळलेली असली तरीही उजवी बाजू अजूनही जशीच्या तशी आहे . मंदिरासमोर याच मंदिराची छोटी प्रतिकृती पडक्या अवस्थेत उभी आहे. स्थानिक नागरिकांना भेटल्यावर भारतीय पुरातत्व खात्याचे या कलाकृती कडे किती दुर्लक्ष आहे हे समजते. प्रवेशद्वार ते सभामंडपादरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. चार देखणे खांब दर्शनीय आहेत. अंतरालगत गाभारा प्रवेशद्वाराजवळ विकारांना आत ओढण्याचा संदेश देणारे कासव आहे. गाभारा प्रवेशद्वारजवळ दोन्ही उभ्या बाजूंना वर्गातील यक्ष, किन्नर, गंधर्वाचे इशस्तवन गाणारे शिल्प व वरील आडव्या बाजूच्या मध्यभागी विघ्नहर्ता या सर्वांचे दर्शन घडते. भक्तांचा अहंकार नम्र करावा म्हणून कमी उंचीचे प्रवेशद्वार आहे, गाभाऱ्यात शिवलिंग आहे. अत्यंत गंभीर, पवित्र, सात्विक अशा या मंद प्रकाशात गाभाऱ्यात विलक्षन शांतता जाणवते.
ह्या ७ मंदिरांपैकी ४ मंदिरे पडली गेली पण ते कोणी पडले हे अद्याप माहिती नाही, पुरातत्व खात्या कडे पण नाही. पण हे उरलेली मंदिरे इंग्रज काळात त्यांच्या निगराणी खाली होते ह्याची माहिती तिथे असलेल्या गेट वर लिहलेली दिसते .
आपल्याला महाराष्ट्रातील इतके मंदिर माहीत आहेत. परंतु या मंदिरसारखी अनेक अशी मंदिरे दडलेल्या खजान्यासारखी आहेत. त्यांच्या जतन आणि संवर्धंनासाठी निदान एकदा तरी त्यांना भेट द्या.
(फोटो – RJ Dipak Wankhade)
Vidarbha Darshan