महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,421

अस्सल शिवचरित्र कोणते ?

By Discover Maharashtra Views: 4446 5 Min Read

अस्सल शिवचरित्र कोणते ?

आजकाल तुम्हाला ‘शिवचरित्र‘ म्हणून खूप जणांनी अनेक पुस्तकं suggest केली असेल त्याला कारणही तसेच आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत ज्यांच्यावर अनेक पुस्तकें निघाली. कुणी त्यांच्यावर कादंबरी लिहली, कुणी नाटक, चित्रपट तर कुणी मालिका यांसारख्या माध्यमातून अनेकांनी महाराजांना त्यांच्या पराक्रमाला अजरामर केलं. त्यातल्या त्यात मालिका, कादंबऱ्या, चित्रपट आणि नाटकं यांनी तर महाराजांना घराघरात पोचवून प्रसिद्धी मिळवली. यामध्ये शिवव्याख्याते कसे मागे राहतील त्यांनी तर अनेक रसाळ, वीरश्री पूर्वक महाराजांच्या शौर्याच वर्णन केलं आहे त्यामागे त्यांचा अभ्यास किती हे त्यांनाच ठाऊक पण असेही काही व्याख्याते आजच्या पिढीत आहेत जे अभ्यासपूर्वक रीतीने महाराजांचे विचार जनमाणसांत पोचवतात.(अस्सल शिवचरित्र कोणते ?)

अनेक दंतकथा ( ज्याला संदर्भ असा नसतो ) त्या मुळात लोकांद्वारेच पसरतात. उदा. छत्री निजामपूर ची घटना आणि हिरकणी ची घटना. शिवरायांची महती सांगण्यासाठी काही कवीही मागे नाहीयेत. अनेक कवींनी त्यांच्या काव्यातून महाराजांना अजरामर केलेलं आहे. शाहिरांच्या डफातुन निनादनाऱ्या थापेतून महाराजांच्या काळात घडलेल्या अनेक पराक्रमाची गाथा आपणांस समजते. शाहीर हे पिढ्यानपिढ्या ही शौर्यगाथा समाजासमोर आणतात.

या आणि अशा अनेक माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हे समाजात, गावागावात आणि घराघरात पोचले. वरील उल्लेख केल्याप्रमाणे अनेक जणांनी विविध प्रकारच्या माध्यमातून महाराज लोकांना सांगितले आणि आपण तोच इतिहास खरा आहे याची कुठलीही शहानिशा न करता विश्वास ठेवला आणि आजच्या काळातही डोळ्यावर पट्टी बांधून आपल्याला ते मान्य आहे कारण आपण शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आपल्याला ती उत्सुकता ही नाही

या सर्व माध्यमांमध्ये दुर्लक्षित राहिलं ते शिवचरित्र. होय शिवचरित्र जे महाराजांच्या पराक्रमाची खरी कहाणी सांगण्यासाठी आपल्या प्रतीक्षेत आहे तेच.

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत अनेक पुस्तके निघाली असून त्यामध्ये बऱ्याचशा लेखकाने त्यांना जसं उचलता येईल तेवढं त्यांनी उचललं आहे. संपूर्ण शिवचरित्र कुण्या एका लेखकाला आतापर्यंत कवेत घेता आलेलं नाही. शिवचरित्रातील अनेक पैलू अजून उजेडात यायचे बाकी आहेत. अनेक प्रसंगात, घटनांत प्रत्येक लेखकाचे किंबहूना संशोधकांचे मतमतांतरे आहेत. असो,

सगळी शिवचरित्र तरी आपण वाचू शकत नाही कारण पुस्तकांची संख्या खूपच झालीये आणि दिवसागणिक त्यात नवीन पुस्तकांची भर पडत चालली आहे त्यामुळे आपल्याला शिवचरित्रातून काय घ्यायचं आहे हे ठरवणं खूप महत्त्वाचं. कारण संपूर्ण शिवचरित्राचा जरी आपल्याला अभ्यास करता येत नसेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा गुण तर आपण नक्किच आत्मसात करायचा प्रयत्न करू.

असेही अनेक शिवचरित्र आहेत ज्यामध्ये लेखकांनी त्यांना साजेसं शिवचरित्र साकारलं. आता ही आपली जबाबदारी की महाराजांना एकाच लेखकाच्या चष्म्यातून बघून संकुचित मनोवृत्ती ठेवायची की डोळसपणे शिवचरित्राचा अभ्यास करायचा. सेक्युलर म्हणून, दैवी अवतार म्हणून, मुस्लिम उदात्तीकरण म्हणून अनेकांनी ज्यांच्या त्यांच्या सोयीनुसार इतिहास लिहून ठेवलाय. अशा वेळी अस्सल कागदपत्रे, समकालीन बखरी, शिलालेख, विरगळ यांचा ही अभ्यास केला पाहिजे. एकाच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात जे कधीच कुणाला संबंधरीतीने मांडता येत नसतात त्याप्रमाणे लेखक त्यांच्या दृष्टिकोनातून एखाद्या विषयावर फोकस करतात. तसा हा शिवसागर खूपच अथांग आहे तो सम्पूर्ण भ्रमण करणे कठीण, तरीही माझ्या माहिती प्रमाणे ही प्रमाण शिवचरित्र आहेत त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

इमेज सोर्स : गुगल

शिवचरित्र:

१) शककर्ते शिवराय – विजयराज देशमुख

२) श्री राजा शिवछत्रपती – गजानन भास्कर मेहंदळे

३) छत्रपती शिवाजी महाराज – कृ. अ. केळुस्कर

४) छत्रपती शिवाजी महाराज – वा. सी. बेंद्रे

५) छत्रपती शिवाजी – सेतुमाधवराव पगडी

६) Chhatrapati shivaji his life & times – गजानन मेहंदळे

७) मराठा रियासत खंड –  गो. स. सरदेसाई

८) शिवछत्रपती एक मागोवा – डॉ. जयसिंगराव पवार

समकालीन बखरी
  •  सभासद बखर – कृष्णाजी अनंत सभासद
  •  91 कलमी बखर – दत्ताजी पंत वाकनविस
काव्य
  • श्री शिवभारत (काव्य) – कवी परमानंद
  • कवी भूषणाचे छंद

त्याचबरोबर मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा वि. का. राजवाडे आणि साधनचिकित्सा हा वा. सी. बेंद्रे यांचा संदर्भ ग्रंथ. भारतीय इतिहास संशोधन मंडळातील काही कागदपत्रे, पेशवे दप्तर, डच, फ्रेंच कागदपत्रे, मोडीतील पत्रव्यवहार, शिलालेख, विरगळी या माध्यमातून आपण खरा इतिहास जाणून घेऊ शकतो.

ही यादी तर कमी आहे. इतिहास हा विषय खूप खोल खोल आहे. तो एकप्रकारे अथांग सागरच आहे  नखशिखांत पादाक्रांत करण्यासाठी मनुष्य जन्म अपुरा आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण शिवचरित्र अजूनही अस्तिवात नाही. अनेक असे प्रसंग आहेत ज्यामध्ये विविध इतिहासकारांचे मत भिन्न आहेत. पण आपल्याला अभ्यास करण्यासाठी आणि शिवचरित्र जाणून घेण्यासाठी वरील शिवचरित्रांचा आपण आधार घेऊ शकतो कारण त्यामध्ये प्रत्येक इतिहासकारांनी अथक परिश्रम घेऊन वेळोवेळी आवश्यक ते संदर्भ देऊन शिवचरित्र आपणासमोर सादर केले आहे.

धन्यवाद !

पहिले ५ शिवचरित्र जरी अभ्यासले तरी आपल्याला बरचसं शिवचरित्र समजून येईल कारण हे पाचही चरित्र साधार लिहले आहेत.

इतिहास वेड
रोहित पेरे पाटील

Leave a Comment