आज्ञापत्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि काशी विश्वनाथ मंदीर :
आज्ञापत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच नीती. आज्ञापत्र हे रामचंद्र नीलकंठ अमात्य यांनी छत्रपती शिवराय यांच्या मृत्यूनंतर सुमारे ३५ वर्षांनी लिहिले. पंत अमात्य घराणे यांनी भोसले घराण्याच्या सुमारे चार पिढ्या पहिल्या होत्या आणि त्यांची सेवाही केली होती. या मुळे राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या रामचंद्र पंत अमात्य यांनी कोल्हापूरकर छत्रपती संभाजी राजे यांच्या हुकुमावरून आज्ञापत्राचे लेखन केले.
आज्ञापत्राबाबत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा अभिप्राय वाचण्यासारखा आहे. पोतदार म्हणतात,
“हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषा आणि मराठी राजकीय वाङ्मयाचे एक अपूर्व लेणे आहे. अथ पासून ते इथपर्यंत हा चिमुकला ग्रंथ हजार वेळा वाचला तरी तृप्ती होत नाही. प्रत्येक वाचनाला याला काही नवीन अर्थ प्राप्त होतो. नवीन सौंदर्य अढळून येते. रामचंद्र निळकंठांची ही नीती म्हणजे ऐतिहासीक वाङ्मयातील एक अमूल्य रत्न आहे. श्री शिवछत्रपतींसारखा कर्ता आणि पंतांसारखा एक अनुभवी वक्ता तेथे परिपाक कसा उतरेल, त्याला तोड नाही.”
याच आज्ञापत्रात शिवछत्रपतींचे काशी विश्वेश्वर सोडवण्याचे ध्येय स्पष्ट नमूद केले आहे. रामचंद्र पंत अमात्य लिहितात,
“श्रीकृपे अचिरकालेच मुख्य शत्रूचा पराभव करून दिल्ली, आगरा, लाहोर, ढाका, बंगाल आदिकरून संपुर्ण तत्संबंधी देशदुर्ग हस्तवश्य करून श्रीवाराणसीस जाऊन स्वामी विश्वेश्वर स्थापना करीत, तावत्काळपर्यत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्री मत्सकलतिर्थीकतीर्थ श्रीन्मातुश्री राहिली आहेत.”
संदर्भ :- रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र
#इतिहास_अभ्यासक_मंडळ