महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,810

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी मशिदी पाडल्या का ?

By Discover Maharashtra Views: 2796 5 Min Read

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी मशिदी पाडल्या का ?

छत्रपतींनी कोणतीही मशीद पाडली नाही , रायगडावर मशीद बांधली अश्या संदर्भहीन थापा काही स्वघोषित शिवव्याख्याते आपल्या व्याख्यानात मांडताना दिसून येतात परंतु छत्रपतींनी मशिदी बांधल्या कि पाडल्या ? छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी मशिदी पाडल्या का ? याविषयीच्या काही तत्कालीन समकालीन नोंदी.

१ ) समकालीन व विश्वसनीय छत्रपती शिवाजी महराजांच्या आज्ञेनेने लिहील्या गेलेल्या शिवभारतातील नोंदीनुसार :-

शिवभारत १८व्या अध्याय श्लोक ५२-५४

त्वया गृहीत्वा कल्याणं तधा भीमपुरीमपी | यवनानां महासिध्दिनिलया: किल पातिता: ||५२||
तु्भ्य कुप्यति तेऽद्यापि यवनाः पवनाशनाः | अपहृ्त्यापी सर्वस्व कृता येषा वीडंबना ॥५३॥
निगृह्य यवनाचार्यानविचार्यात्मनो बलम । प्रनतबध्नास्याववद्दानामध्वानमकुतोभयः ॥५४॥

शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी काबीज केल्यानंतर यवनांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या. यवनांनचे सर्वस्व हरण करून शिवाजी महाराजानी विडंबना केली आहे , तसेच काजी व मौलवी यांना देखील कैद केले.

२ ) शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १९२० , जेस्वीटांचा वृत्तात

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीचे राज्य जिंकल्यावर हिंदुस्थानातील मुसलमानांचे वाढते बळ लशात घेऊन भविष्यात त्यांच्या प्रतिकार करता यावा म्हणून मुसलमानांना राज्यतून हकलवून लावताना मशिदीचा अपमान आणि भ्रष्टकार केला

३ ) शिवचरित्र सहित्य खंड ८ ले.४९ मधील नोंदीनुसार .

मुस्लीम आक्रमणकर्त्यांनी तीरुवन्नमलाईचे व शंकराचे मंदिर उध्वस्त केले होते. यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी दोन मशीदी बनविल्या होत्या . छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला व पुढे तीरुवन्नमाले येथे गेले. शिवाजी महाराज हे शिवभक्त होते. सदर दोन्ही मशीद पाडून शिवाजी महाराजांनी परत मंदिराची निर्मिती केली.

४ ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञाने लिहील्या गेलेल्या राजव्यवहारकोश यामधील नोंदीनुसार

उत्सादितां चिरतरं यवनै: प्रतिष्ठाम्
शोणाचलेशितुरयं विधिवद्विधाय |
श्रीमुष्णवृध्दगिरिरूक्मसभाधिपानाम्
पूजोत्सवान्प्रथयति स्म सहात्मकीर्त्या ||८०||

छत्रपती शिवाजी महाराजांनी शोणाचलपती येथे मशिदी पाडून यवनांनी उध्वस्थ केलेल्या मंदिराची विधीपूर्वकस्थापना केली.

५ ) जॉन फायर नावाचा इंग्रज प्रवासी कल्याण भिवंडीला आला तो लिहितो

“ शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदींचे धान्याच्या कोठारात रुपांतर केले. ( New account of East India and Persia vol.1 )

६ ) Storia do mogor, vol 2,

मिर्झा राजा जयसिंग याने स्वराज्यावर स्वारी केली त्यावेळी मोगल दरबारातील इटालियन प्रवासी मनुची देखील मोगल छावणीत हजर होता व प्रत्यक्ष शिवाजी महाराजांशी त्याची भेट झाली होती तो लिहितो “ मुसलमानांनी शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी गाईची हत्या करून मंदिरात टाकल्या त्यामुळे शिवाजी महाराजांनी डुक्कर मारून मशिदीत टाकण्याची आज्ञा आपल्या लोकांना दिली.

रायगडावरील मशीद ?

७ ) शिवचरित्र साहित्य खंड ३ लेखांक ६६८

इ.१६६३ -१६६४ इंदापूर मशिदीचा काजी लिहितो “ शिवाजी राजे याचे कारकिर्दी भोगवाटा जाहला नाही “ म्हणजे सदर मशिदीचे इनाम शिवाजी महाराजांनी बंद केले.

८ ) शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ पत्र क्रमांक १०४२ मधील नोंदीनुसार

छत्रपती शिवाजी महाराज जयसिंगाला लिहिलेल्या पत्रात लिहितात “हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इस्लामचे जड मुळ खोदून टाक. मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व यांच्या पराक्रमाचे फळ न्हवे . आम्ही लोकांनी हिंदू, हिंदुस्थान व हिंदूधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोमाचे प्रयत्न केले पाहिजे. मेघा सारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी तलवारीचा पाऊस पाडीन आणि दक्षिण देशांच्या पटलावरून इस्लामचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकिन.

सदर समकालीन व विश्वसनीय नोंदीवरून आपणास दिसून येते कि शिवाजी महाराजांनी मशिदी जमीनदोस्त केल्या . समकालीन कोणत्याही संदर्भ साधनातून रायगडावर मशीद बांधल्याचे संदर्भ नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यवनांच्या मशिदी पाडत तसेच नवीन मशिदीला इनाम दिल्याची नोंद नाही . तसेच राजा जयसिंग याला लिहिलेल्या पत्रातून शिवाजी महाराजांचा उद्देश आपणास स्पष्ट दिसतो. असे असताना शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या राजधानीवर मशीद का बांधतील.

छत्रपती संभाजी महाराज

शिवाजी महाराजांनी यवनांनच्या मशिदी पाडून मंदिर उभारली तसेच संभाजी महाराजांनी देखील मदरसे व मशिदी उध्वस्त केल्या

९ ) मोगल सरदार मातबरखान बादशहा औरंगजेबाला पत्राद्वारे कळवितो कि “ संभाजी महाराजांनी धर्मद्वेषातून तळकोकणातील मदरसे व मशिदी उध्वस्त केल्या”

लेखन आणि संकलन : – नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :-
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ आणि २
शिवभारत
राजव्यवहारकोश
शिवचरित्र सहित्य खंड ३ आणि ८
New account of East India and Persia vol.1
मातब्बर खानाची पत्रे
Storia do mogor, vol 2,

Leave a Comment