शिवाजी महाराजांचे परराष्ट्रीय धोरण
शिवाजी महाराजांचे सामर्थ्य पोर्तुगीजांनी जाणले होते .त्यामुळे पोर्तुगीजांनी समुद्रावरचे मराठे ह्यांच्या समुद्री वाटचालीवर आडव्यात कधी आपली बंदूक किंव्हा तोफ-गोळा ह्याची लुडबुड जास्त केली नाही . १६६० मध्ये चौलपासून दाभोळपर्यंतचा भाग स्वराज्यात महाराजांनी शामिल करून घेतलेला आहे . अर्थातच पोर्तुगीजांच्या सीमेला स्वराज्याची सीमा भिडली. ह्यावेळी सिद्दी , मोगल , आदिलशाही व पोर्तुगीज एकत्र आले असते तर कोकण प्रांत स्वराज्यात राहिला नसता .
महाराजांच्या राजकारण मुळे पोर्तुगीजांनी स्वराज्याशी वैर केले नाही .ह्या बद्दल पोर्तुगीज इतिहासकार परेन जे शिवाजी महाराजांविषयी केलेले वर्णन –
एका प्रकारचे कोडे ( न उकळणारे रहस्य) , अद्भुतरम्य , साहसप्रेमी आणि धाडसी , नशीबवान . एक भटक्या सरदार , आकर्षित करणारी तीक्ष्ण नजर , शीघ्रता , मनमिळाऊ आणि सौजन्यशील स्वभाव , सिकंदराप्रमाणे विचार ठेवून माणुसकी जपून औदार्याने वागवणारा उत्स्फूर्त आणि तरल बुद्धिमत्तेचा , झटपट निर्णय घेणारा , दृढ निश्चयी , शिस्त प्रेमी , निष्णात डावपेची , दूरदृष्टीचा प्रतिभावान राजपटू , कुशल संघटक , दिल्लीचे मोगल , विजापूरचे तुर्क , पोर्तुगीज , डच , इंग्रज आणि फ्रेंच या प्रतिस्पर्धांशी चतुराईने राजकारण करणारा राजा आहे.
महाराजांनी परराष्ट्रीय धोरणाशी संबंधित असलेल्या सूत्रांचा विचार करूनच आपले परराष्ट्रीय धोरण निश्चित केलेले आहे.१६७९ मध्ये खांदेरी बेट महाराजांनी ताब्यात घेतला आणि इंग्रजांना धारेवर धरले आणि ह्याच मुळे समुद्रावर मराठ्यांच्या आरमाराने इंग्रजांच्या महत्त्वाकांक्षेला पायबंद घातला . २६ नोव्हेंबर १६६४ चे सुरत फॅक्टरी रेकॉर्डमध्ये अनेक पत्रे बोलके आहेत . एक पत्रात शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याबाबतची कबुली दिली ती अशी
“दख्खन आणि दक्षिण भारताचा समुद्र किनारा एका प्रकारे अराजकाच्या भोवऱ्यात सापडले आहेत . अशा वातावरणात शिवाजी राजा मात्र यशस्वीरित्या आणि अनिर्बंधपणे राज्य करीत आहे . सोभवती राज्य करणाऱ्या सर्व सत्ताधीशांना शिवाजी ह्या नावाची आणि त्याच्या कारकीर्द ची दहशत बसली आहे . त्याची शक्ती दिवसांदिवस वाढत आहे.”
माहिती साभार:- मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)