कसे दिसायचे शिवाजी महाराज?
छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. जशी परकीयांना शिवाजी महाराज यांनी भुरळ घातली होती तशी आजच्या तरुणाईला देखील घातली आहे. इंटरनेट मुळे आज सर्वत्र हे घ्या शिवाजी महाराज यांच ओरिजिनल चित्र, किंवा हा बघा शिवाजी महाराज यांच लंडन येथील चित्र अशे आशयाचे हजारो message फिरत राहतात. पंरतु नक्की शिवाजी महाराज दिसत कसे होते? समकालीन लोकांनी काही नोंदवून ठेवले आहे का? शिवाजी महाराज यांचे चित्र उपलब्ध आहे का? अश्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
महाराजांनी १६६४ पहिल्यांनदा सुरत लूटली तेव्हा अनेक लोकांनी शिवाजी महाराज यांना पाहिले. वखारीतील इंग्रज अधिकारी रेव्हरंड एस्कलिअट याने महाराजांनचे वर्णन नोंदवून ठेवले:
‘His(Shivaji) person is described by them whoe have seen him to bee of meane, lower some what than I am erect, and of excellent proportion; active in exercise and when ever hee speaks seemes to smile; a quick and peeroing eye, and whitter than any of his people ’
याचा थोडक्यात अर्थ की शिवाजी राजे उंची ने मध्यम, बांधेसूद शरीर, हालचालीत चपळ,बोलताना चेहऱ्यावर स्मित हास्य, जलद व भेदक नजर व इतर लोकांन पेक्षा गोरा वर्ण.
१६६६साली फ्रेंच प्रवासी थेवेनॉ ह्याने सुरतहून माहिती मिळवली व त्याच्या नोंदी करून ठेवल्या.थेवेनॉ लिहतो:-
‘This Raja is short and tawny with quick eyes that shew a great deal of wit. He eats once a day commonly, and he is in good health;and when is plundered Surat in the year One thousand six hundred and sixty four he was but thirty five of age’
थेवेनॉ नुसार राजे उंची ने बारके आहेत, रंगाने गोरे, तेज नजर जे त्यांच्या बुध्दिमत्तेचे दर्शन घडवते. राजे सहसा दिवसातून एकदाच जेवतात तरीही त्यांची प्रकृती चांगली आहे. राजांनी सुरत लुटली त्या समयी त्यांचे वय पस्तीस (३५) होते. १६६६ साली महाराज आग्य्राला गेले होते त्या वेळी कुंवर रामसिंग याच्या पदरी असणाऱ्या परकालदास याने शिवाजी महाराज यांना पाहिले व दिसण्याच्या नोंदी करून ठेवली.परकालदास लिहातो की:
“अर सेवाजी डेल तो हाकीर छोटोसो ही देखता दीस जी
अर सुरती बहुत अजाइब गोरो रंग अपुछो राजनी दिसो जी।
हीम्मती मरदानगीने देखता ही असौ दिसो जो बहुत जो बहुत मरदानो
हिम्मत बुलंद आदमी छो। सेवाजी ने दाडी छे।”
प्रथमदर्शनी शिवाजी राजा उंची ने छोटा व सडपातळ दिसतो.त्यांचा रंग विलक्षण गोरा असून या मूळेच त्यांची राजसमुद्रा स्पष्ट होते.पाहता क्षणी माणूस हिम्मती व मर्दानी दिसतो. शिवाजी राजे यांना दाढी आहे.
१६९५ साली कोस्मो द गार्द याने शिवाजी महाराज यांचे चरित्र लिहले.त्यात शिवाजी महाराज यांचे वर्णन करताना तो लिहतो:
‘He knew that he was not only quick in his action but lively in carriage also, for with clear and fair nature had given him the greatest perfections, especially the dark big eyes were so lively that they seemed to dart rays of fire. To these was added a quick, clear and acute intelligence.
त्यांना(शिवाजी राजे) यांना सुध्दा माहिती होते की ते आपल्या कृतींमध्येच वेगवान नव्हते तर वागण्यात सुध्दा चपळ आहेत. त्यांना निसर्गाने मोहक चेहरा व बांधा दिला आहे.त्यांचे काळेभोर विशाळ नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्नि स्फुल्लिंग बाहेर पडत आहे.त्या सोबत एक स्पष्ट व तीक्ष्ण बुध्दिमत्ता जोडली गेली आहे.
शिवाजी अँड हीज टाइम्स(SHIVAJI AND HIS TIMES) जदुनाथ सरकार लिखित या पुस्तकात शिवाजी महाराज यांचे ओर्म याने छापलेले चित्र छापले आहे.१० मार्च १९०४ला इर्विन(Irvine) याने जदुनाथ सरकारांना शिवाजी महाराज वर्णन दिलेले होते. त्यात तो इर्विन असं म्हणतो की:-
‘Black beard and moustache- long hair at sides- gold pagri- jewelled aigrette- black plume- white jigah(pearls)- flowered coat with white ground purple slik scarf thrown across shoulder- worked sash- peshqabz(dagger) sticking out from waist on left side- right hand hidden in hilt of pattah or rapier- left hand holding a dhup or straight sword ’
‘काळी दाढी व मिशी, लांब कल्ले, सोनेरी रत्नजडित पगडी, त्याला काळा शिरपेच तुरा व त्याला खोवलेल्या मोत्याच्या माळा. फुलांची नक्षी असलेला पांढरा अंगरखा व त्यावर रेशमी उपरणे. सुती कमरपट्टा, डाव्या बाजूस कमरेला कट्यार. डावा हात हा पट्ट्याच्या मुठी मुळे झाकला गेला आहे. उजव्या हातात धोप तलवार आहे’
जेम्स डगल्स याने १८८३ मध्ये ‘A BOOK OF BOMBAY’ नावाने मुंबईचा १६६१ पासूनचा इतिहास त्याने लिहला. यात २०भाग(Chapter) आहेत. या पुस्ताकाच्सा ५व्या भागात शिवाजी महाराज जीवन चरित्र लिहले आहे. या सोबत शिवाजी चित्र सुध्दा दिले आहे. डगल्स लिहतो:-
A keen eye, a long aquiline and somewhat drooping nose, a neat trim cut beard and small moustache make up for us a face, stolid feline, and fair for a Mahratta-somewhat melancholy but a wonderful face, in which knowing even less than we now know, we could descry ability and cunning, and the hardihood and daring of a conspirator against the rights of man-one not easily cowed or alarmed,with a strong faith in himself , and a gift to measure his own capcities, and those of the men who were to be his helpers in his carrer of aggrandisement. Well worth looking at this man among men; sash across his breast, himself a star of India, baleful enough, kingly cowl with tassel of pearl and feather. He proclaims himself the undisputed ruler of dusky millions.
भेदक नजर, गरुडासारखे नाक, कोरिव दाढी, चेहऱ्यावर छोट्या मिश्या भक्कम चेहरा, गोरा मराठा, काहीसा विषाद परंतु नितांत सुंदर चेहरा. जे आपल्यापेक्षा कमी जानून आहेत त्यांना हे माहित नाही की त्यांच्या कडे प्रत्येक गोष्टीचा वेध घेण्याची क्षमता आहे. शत्रूसाठी धुरत, हिम्मती व ताकदवान आहेत, मानवी हक्कांसाठी लढणारा माणूस. नेहमी सावध असतात स्वत: मध्ये दृढ विश्वास. दुसऱ्यांच्या क्षमता ओळखण्याची त्यांच्या कडे कला आहे. लोक त्यांच्या कडे लोक आदराणे पाहतात. छाती वर शेला घेतलेला, , त्यांच्या कडे असलेल्या जिरेटोपास मोत्याचा झुबका आहे. ते ह्या दीन लोकांचे निर्विवादीत राजे आहेत.
डॉ बालकृष्ण यांच्या ‘Shivaji The Great’ या मध्ये ते शिवाजी महाराज यांच वर्णन करताना बर्नियर ने छापलेले चित्र(मुळ चित्र:-एफ. व्हॅलेंटाईन) व मीर मुहम्मद या दोघांच्या चित्रांचा आधार घेतात,लिहतात:-
‘They all showed him possessing a black beard and moustache, long hair at side a , a flowered chint toga with white ground, a purple silk scarf rich in gold embroidery thrown across the left shoulder,, a beautifully worked sash, a Muslim paijama and stylish pair of embroidered shoe. The gold pagri or turban with jewlled aigrette, black plume and white pearls is peculiar to Shivaji. He can easily indentified by the shape of his turban. He is holding a very long straight sword probably well known Bhavani in his left hand and a patta or rapier in is right hand.Then on the left side a dragger is sticking out from waist from waist. One can easily markout sharp eyes a long aquiline nose, a neat and trimly cut beard and small moustaches covering his upper lip. His face is firm and awe inspiring’
त्यासर्वांनी त्यांना काळी दाढी व मिशा व कानाच्या बाजुला लांब केस असल्याचे दाखवले आहे. असंख्य फुलांची नक्षी असलेला पांढरा अंगरखा(झब्बा). त्यावर जांभळ्या रंगाचा शेला असून त्यावर सुर्वणकाम केले असून तो डाव्या खांद्यावर घेतले आहे. कमरेला सुंदर वीन कामकेलेला कमरपट्टा आहे. मुस्लिम पध्दतीचा पायजमा घातला असून, पायात सुंदर मोजडी आहे. सोनेरी पगडी, त्याला रत्नजडित तुरा व त्यात खोवलेल्या मोत्याच्या माळा अगदी शिवाजी राजांन सारखे.त्यांना त्यांना त्यांच्या पगडी च्या आकारावरून ओळखता येते. त्यांच्या डाव्या हातात एक लांब तलवार आहे बहुदा ती भवानी तलवार असावी. डाव्या कमरेला कट्यार आहे. त्यांच्या तीक्षण डोळ व धारदार आणि सरळ नाकावरून कोण ही त्यांनी ओळखू शकत. त्यांचा चेहरा हा गोरा असून तो विस्मयकारक आहे
ही झाली लेखी वर्णन. शिवाजी महाराज यांची समकालीन चित्रे देखील आज उपलब्ध आहेत. त्या सर्व चित्रांना जर नीट निरखून पाहिलं तर त्या चित्रांतून महाराजांची राजस मुद्रा स्पष्ट होते. डोक्याला मंदिल, कमरेला कट्यार, हातात धोप तलवार, गळ्यात मोत्यांच्या माळा, पाणीदार डोळे, पांढरा अंगरखा त्यावर फुलांची व पानांची नक्षी. वरील दिलेलं वर्णन(समकालीन) व ही समकालीन चित्रे एकमेकांशी तंतोतंत जुळतात. खाली अशीच महाराजांची समकालीन चित्रे दिलेली आहेत.
चित्रास साभार:-
Rijkes Museum Amsterdam
British Library
Musse Guimet, Paris
Staatsbibliotheek, Berlin
-प्रथमेश खामकर