शिवराय –
शिवराय म्हणजे अखंड शक्तीचा स्तोत्र , कधी ही न मावळणारा भास्कर ह्याची सर्वांना जाणीव आहेच. परंतू शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे एकोजी राजांना लिहलेले का कोणास ठाउक हे पत्र जेव्हां जेव्हां वाचतो तेव्हा तेव्हा अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. हे पत्र शिवकालीन पत्र संग्रह , मराठ्यांचा पत्ररुप इतिहास आणि शिवचरित्र साहित्य खंड ह्यात उपलब्ध आहे….! ह्या पत्रतली एक एक ओळ सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशी आहे…! जेंव्हा महाराजांनी एकोजी राजांना हरवलं व समज देऊन परत महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना समजल की एकोजी सर्व काही सोडून एकांतात असतात काहीच करत नाही त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराजांनी हे पत्र पाठवले…! ह्या पत्रातील काही ओळी खालील प्रमाणे…!
” कैलासवासी स्वामींनी कसे कसे प्रसंग पडले ते निर्वाह करून यवनांच्या सेवा करून आपल्या पुरुषार्थ बाजी सवारून उत्कर्ष करून घेतला. ” पुढे महाराज बोलतात की ” संसाराची कृतज्ञता मानून नसते वैराग्य मनावरी आणून कार्य प्रजननाचा उद्योग सोडून लोकाहाती
रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहान पण कोन निती ? ” ह्या पुढे महाराजांचं एक वाक्य आहे म्हणजे समस्त हिंदुस्थानातील पोरांना महाराजांचा असलेला आशीर्वाद महाराज बोलतात ” आम्हीं तुमचे वडील मस्तकी असता चिंता कोण गोष्टीची आहे ” सोप्या मराठीत सांगायचं झाल तर महाराज सांगतायत की माझा हात तुमच्या मस्तकावर असताना तुम्हाला कसली चिंता…! ह्या पत्रातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवाव्या अश्या २ ओळी पात्राच्या शेवटला आहेत त्या अश्या ” हे कार्य प्रजननाचे दिवस हे आहे ती. वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे थोडे आज उद्योग करून आम्हास ही पराक्रमाचे तमासे दाखवणे ”
बाकि सध्या बऱ्याच लोकांचं मानसिक अवस्ता नसते सतत येणारे प्रॉब्लेम , अडचणी ह्यांनी खचून जातात आणि काही येडा वाकडा निर्णय घेतात त्यानी कधीच खचून जाऊ नका करणं महाराज सांगता ना की ” आम्हीं तुमचे वडील मस्तकी असता चिंता कोण गोष्टीची आहे ”
अक्षय कदम