शिवराई भाग १३…
काल आपण १२३० फसली सन अंकित शिवराई पहिली. आज त्यापुढची म्हणजेच १२३१ फसली सन अंकित शिवराई पाहणार आहोत. १२३१ फसली सन अंकित शिवराई मध्ये विविधता येते. कधी ‘श्री नंतर १२३१’ लिहिलेले असते कधी ‘श्री आधी १२३१’ लिहिलेले असते तर कधी ‘सन’ असे मोडी लिपी मध्ये लिहून त्यापुढे ‘१२३१’ असते आणि यात आणखी एक दुर्मिळ व्हरायटी येते ती म्हणजे ‘श्री/ सन १२३१/ राजा’ आणि मागील बाजूवर ‘छत्र/ पती’ हि सर्व नाणी काही कमी प्रमाणात मिळतात, या सर्व शिवराई संग्रही असाव्या अशी संग्राहकाची मनापासून इच्छा असते.
मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आज सादर नाण्याचे वजन साधारण १० ग्राम असून त्यावर पुढील बाजूनी ‘श्री १२३१/ राजा’ आणि मागील बाजूवर ‘छत्र/ पती’ अंकित आहे, मागील बाजूवर ‘छ’ च्या आधी ३ बिंदुही अंकित आहेत. अशी आहे फसली सन १२३१ अंकित शिवराई.
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….