शिवराई भाग १५…
आजचा दिवस १२३२ अंकित शिवराई चा.
पूर्वी सांगितल्याप्रमाणे १२३२ शिवराई चे हि २ प्रकार येतात ते म्हणजे ‘श्री १२३२’ आणि ‘१२३२ श्री’. आज श्री १२३२ अंकित शिवराई दाखवतोय, या शिवराई वर श्री १२३२ अशी पूर्ण अक्षरं येणं म्हणजे फारच अवघड आणि संग्राहक अशाच शिवराई च्या शोधात सदैव असतात. या नाण्यांवरही मागील बाजूस ‘छत्र’ ऐवजी ‘छेत्र’ पाहायला मिळते बाकी मजकूर सारखाच असतो. पूर्ण मजकूर पुढील बाजूस ‘श्री १२३२/ राजा’ आणि मागील बाजूस ‘छेत्र/ पती’ असा आहे.
नाणे तांब्याचे असून वजन ९.६५ ग्राम आहे. काल सादर केलेल्या शिवराई सारखी कुठलीही ‘सन’ वगैरे अक्षरे यावर येत नाहीत, बहुदा ‘सन’ हि अक्षरे फक्त १२३१ अंकित शिवराई वरच येत असावीत मी तरी अजून १२३१ व्यतिरिक्त इतर कुठल्या तारखेवर ‘सन’ हा शब्द पाहिलेला नाही.
अशी आहे १२३२ अंकित शिवराई !
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….