शिवराई भाग १६…
श्री १२३२ सारखे या नाण्यांचे उपप्रकार आपण नंतर पाहुयात पण त्याआधी यातील ठळक प्रकार पाहणे गरजेचे आहेत त्यातील आज आपण पाहणार आहोत ‘१२३३’ अंकित शिवराई. १२३३ अंकित शिवराई वर ठळक अक्षरं मला पाहायला मिळालेली नाही बहुदा या शिवराई वरील अक्षरे क्रूड असतात. १२३३ आधी एक आणि नंतर एक असे बिंदूही त्यावर पाहायला मिळालेले आहेत. १२३३ अंकित शिवराई चांगल्या स्थितीत मिळणे म्हणजे कठीणच आहे.
कधी श्री अक्षर आले तर १२३३ येत नाही तर कधी १२३३ आले तर श्री नाण्याबाहेर गेलेले असते. नाण्याचे साधारण वजन ९ ते १० ग्राम असते आणि धातू तांबे च आहे.
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल