शिवराई भाग १७…
श्री १२३४ लिहीलेली शिवराई तशी काही प्रमाणात कमीच मिळते. नाण्यावरील श्री बऱ्याचदा नाण्याबाहेर जातो तर काही वेळी ४ अंक काहीसा बाहेर गेलेला दिसतो फक्त ४ ची गाठ बऱ्याचदा दिसते त्यामुळे तो ० असल्याचाही भास होतो. या नाण्यातही २ प्रकार येतात १२३४ आधी श्री आणि १२३४ नंतर श्री. आज सादर आहे श्री १२३४. अगदी स्पष्ट असे १२३४ नाण्यावर अंकीत आहे. राजा च्या जा नंतर फुल ही कधी कधी नाण्यावर दिसते. तर मागील बाजुवर छत्र ऐवजी छेत्र असुन त्र नंतर ही काही चिन्ह दिसते. सर्वसाधारण शिवराई प्रमाणेच या नाण्याचा आकार आणि वजन आहे आणि बाकी मजकुरही तसाच आहे.
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल