महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,536

शिवराई भाग १८

By Discover Maharashtra Views: 3625 1 Min Read

शिवराई भाग १८…

फसली सन अंकित शिवराई नाण्यांमधील एक कमी मिळणारे नाणे आपणास दाखवतोय. ते म्हणजे ‘१२३९’ अंकित नाणे. शिवराईवरील फसली सन अंकित बाकी नाण्यांपेक्षा हे नाणे कमी मिळते. काल तुम्हाला श्री १२३४ अंकित नाणे दाखवले. शिवराई वर फसली सन १२३४ नंतर १२३५, १२३६, १२३७, १२३८ अंकित नाणी सापडत नाहीत, मी तरी अजून पहिले नाही. abbot ने लिहिलेल्या लेखात तो यातील काही शिवराई पहिल्याच उल्लेख करतो पण त्याची छायाचित्र मात्र दाखवत नाही त्यामुळे त्यावर तोवर विश्वास ठेवणे शक्य नाही जोवर हि नाणी आपण प्रत्यक्ष पाहत नाही.

१२३९ अंकित नाण्यांवर राजा नंतर एक फुलासारखे चिन्हही पाहायला मिळते. तर मागील बाजूनी असलेल्या छत्र वर देखील काही चिन्ह आपल्याला दिसतात. या शिवराई चांगल्या स्थितीत मिळवणं जरा कठीणच जात. नाण्याच वजन, आकार हा सर्वसाधारण दुदांडी शिवराई नाण्याप्रमाणेच आहे.

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a Comment