महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,598

शिवराई भाग १९

By Discover Maharashtra Views: 3602 1 Min Read

शिवराई भाग १९…

१२३९ च्या नंतरची मिळणारी शिवराई आहे १२४० अंकित शिवराई. या शिवराई वर श्री नंतर १२४० अंकित केलेले असते. पण सादर नाण्यावर १२४० आधी श्री न दिसता वर्तुळ दिसत आहे बहुदा त्या वर्तुळाआधी श्री असावा. आणि बाकी मजकूर सारखाच म्हणजे ‘० १२४०/ राजा’ आणि ‘छत्र/ पति’ असा आहे. पुढील बाजूवर फक्त १२४० दिसत असून बाकी मजकूर नाण्याबाहेर गेलेला आहे. नाण्याचे वजन १० ग्राम असून धातू तांबे आहे. १२३० पासुन १२४० पर्यंत सन अंकीत नाणी आपल्याला मिळतात पण त्यातील १२३५, १२३६, १२३७, १२३८ अजुन मिळालेली नाहीत, मी पाहिलेली नाहीत. तर १२४० हि शेवटची सन असलेली शिवराई. १२४१ आणि त्यापुढील सन अंकीत नाणी मी पाहिलेली नाहीत.

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a Comment