शिवराई भाग २…
पहिल्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे ताम्र नाणे ‘शिवराई’ पाहिले. आपण निरीक्षण केल्यास आपल्याला दिसले असेल की त्यावर बिंदुमय वर्तुळ होते आणि त्यात महाराजांचे नाव होते. काल टाकलेल्या नाण्यावर बारीक बिंदुंचे वर्तुळ होते तर आज जे नाणं दाखवतोय त्यावर जाड बिंदुंचे वर्तुळ असुन या नाण्यावरील बिंदु सुटसुटित आहेत. आतील मजकुर सारखाच म्हणजे पुढिल बाजुनी तीन ओळीत- ‘श्री/राजा /शिव’ आणि मागील बाजुनी- ‘छत्र/पति’ असाच आहे. बिंदुंमधला फरक दर्शवण्यासाठी हे नाणे सादर केले.
काल आणि आज पाहिलेले हे नाणे होते एक पैसा शिवराई. आवडले असतीलच. अजुन या प्रकारांतील बर्याच शिवराई दाखवायच्या होत्या पण 250 वर्षांचा प्रवास 30 शिवराई मधे दाखवायचाय म्हणुन थोडक्यात आटोपतं घेतोय कारण अजुन बरच काही पहायचय.
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
आपलाच
आशुतोष पाटील
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल