शिवराई भाग २१…
शिवराई वर विविध शेकडो चिन्ह आणि विविध प्रकारचे बिंदू येतात आणि आपल्याकडे आता #स्वराज्याचे_चलन च्या #30ShivraiOn30Days या सिरीज मध्ये दिवस बाकियेत फक्त १० ! आणि विविध चिन्ह पाहायचे म्हटल्यास ते शक्य वाटत नाही त्यामुळे आपण १ च चिन्ह घेऊन त्याचे विविध १० प्रकार या १० दिवसात पाहुयात. तर यासाठी आपण चिन्ह निवडलंय ‘फुल’, आता पुढचे १० दिवस शिवराई वरील विविध १० प्रकारचे आणि नाण्यावर विविध ठिकाणी अंकित ‘फुल’ हे चिन्ह पाहुयात.
आजच्या नाण्यावर ‘फुल’ चिन्ह अंकित आहे नाण्यावर ‘श्री’ या अक्षराच्या ‘आधी’. हे काहीसे वेगळे नाणे मला पाहायला मिळाले. या नाण्यावर श्री आधी फुल हे चिन्ह सरळ नसून उलटे अंकित आहे आणि त्यावर बाजूनी बिंदुमय वर्तुळ असल्यासारखे देखील वाटत आहे. बाकी मजकूर दुदण्डी शिवराई नाण्याप्रमाणे ‘श्री/ राजा’ आणि ‘छत्र/पति’ असाच आहे. नाण्याचा धातू तांबे असून वजन ९.५ ग्राम आहे. मागील बाजूवर ‘छ’ आणि ‘त्र’ या दोन अक्षरांमध्ये बिंदू हि पाहायला मिळतो.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….