शिवराई भाग २२…
आज पाहुयात ‘श्री च्या नंतर असलेले फुल’ ! या नाण्यावर श्री नंतर असलेल्या चिन्हास फुल म्हणावे कि पान कळत नाही पण असेच एक प्रकारचे फुल राजा नंतर येते आणि ते हि आपण पुढे पाहणार आहोतच म्हणून यास फुल म्हणूया. या प्रकारातले आणखी स्पष्ट नाणे उपलब्ध झाल्यास शंकानिरसन होईल. सादर नाण्यावर श्री नंतर उलटे फुल पाहायला मिळत आहे फुलाची एक पाकळी नाण्यावर स्पष्ट दिसतीये, बाकी मजकूर बाकी नाण्यांप्रमाणेच असून राजा नंतर काही बिंदू दिसतात तर मागील बाजूवर ‘छ’ या अक्षराचे वळण देखील काहीसे वेगळे पाहायला मिळते.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल