शिवराई भाग २३…
मित्रांनो,
काल श्री च्या नंतर असलेले उलटे फुल पाहिल्यानंतर आज आपण पाहुया ‘राजा’ नंतर असलेले फुल. अतिशय सुंदर आणि ठळक असे फुल या नाण्यावर अंकीत आहे. राजा खाली तिसऱ्या ओळीत ‘शाउ’ असावे तर वर १२३४ तारीख असल्यासारखे वाटते पण ती स्पष्ट नाही. नाण्यावर फुल स्पष्ट आले असल्याने ‘रा’ हे अक्षर नाण्याबाहेर गेलेले आहे. मागील बाजुवर छत्र ऐवजी ‘छेत्र’ अंकीत असुन छेत्र आधी दोन टिंब आणि छेत्र वर डावीकडे चंद्रकोर आणि उजवीकडे एक फुल दिसते ते सविस्तर पुढे पाहुच, त्याखाली पती असा मजकुर आहे.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल