शिवराई भाग २५…
मित्रांनो,
आपण शिवराई वरील विविध प्रकारचे असलेले ‘फुल’ चिन्ह मागील ५ दिवसापासून पाहत आहोत. काल ‘छ’ अक्षराआधी असलेले एक प्रकारचे फुल आपण पहिले आज त्यातला दुसरा प्रकार आपण पाहुयात.काल पाहिलेले फुल हे काहीसे कमळासारखे दिसत होते आज सादर फुल हे बिंदुंचे बनलेले आहे. ‘छ’ आधी पाच जोडलेल्या बिंदुंचे फुल नाण्यावर अंकीत आहे. बऱ्याच सुटसुटीत जागेत हे चिन्ह अंकीत आहे. पुढील बाजुवरही राजा आधी २ बारीक बिंदु तर श्री आधी ३ बिंदु दिसतात. बाकी नाण्यावरील मजकुर हा सामान्य दुदांडी नाण्याप्रमाणेच असुन नाण्याचे वजन ९.७ ग्राम आहे.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल