शिवराई भाग २६…
मित्रांनो,
आजचे फुल ‘छ’ आणि ‘त्र’ च्या मध्ये. ‘छ’ आणि ‘त्र’ च्या मधील फुलाचे ३ विविध प्रकार माझ्या संग्रही आहेत ते आपण आजपासून ३ दिवस पाहुयात. आजचा प्रकार पहिला. यात असलेले फुल ३ पाकळ्यांचे असून त्याला खाली दांडीही दिसते. नाण्यावर हे फुल ठळक पण बारीक आहे. बाकी काही चिन्ह नाण्यावर नाही, काही बिंदू पुढील बाजूवर दिसतात पण ते ठळक नाहीत. नाण्याच्या मागील बाजूवरील ‘छ’ चे अक्षरवळन देखील काहीसे वेगळे आहे. बाकी नाण्यावरील मजकुर हा सामान्य दुदांडी नाण्याप्रमाणेच असुन नाण्याचे वजन १० ग्राम आहे.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल