शिवराई भाग २८…
मित्रांनो,
आज छ आणि त्र मधे फुल असलेल्या शिवराई चा तिसरा आणि शेवटचा दिवस. आज च्या शिवराई वर असलेले फुल जरा वेगळे वाटते, ते काहीसे तलवारीसारखे देखील वाटते पण शिवराई वर तलवार चिन्ह असलेल्या शिवराई चे निरीक्षण केल्यास ती तलवार यापेक्षा फार भिन्न आहे, म्हणून आपण याला तलवार न म्हणता एक प्रकारचे फुल म्हणूया. हि शिवराई दुदण्डी प्रकारातील असून पुढील बाजूवरील श्री/ राजा च्या खाली ‘सीव’ ची वेलांटी आपल्याला दिसते आहे. आणि मागील बाजूवर छत्र मध्ये फुल असून खाली पति आहे. नाण्याचा धातू तांबे असून वजन ९. ६ ग्राम आहे.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल