शिवराई भाग २९…
मित्रांनो,
‘छ’ आणि ‘त्र’ मधील फुलाचे ३ प्रकार पाहिल्यानंतर आज आपण पाहूया ‘छत्र’ या शब्दाच्या वर असलेले फुल. हि दुदण्डी प्रकारातील शिवराई आहे आणि हे ओळखायला आता आपण सज्ज झालेला आहातच. नाण्याची मागची बाजू डावीकडे आणि पुढील बाजू उजवीकडे दाखवलेली आहे. नाण्याच्या पुढील बाजूवर श्री/ राजा आपल्याला नाण्यावर दिसते पण त्याव्यतिरिक्त तिसऱ्या ओळीत असलेले राजाचे नाव नाण्याबाहेर जरी गेलेले असले तरी ते ‘शाउ’ होते असा अंदाज आपल्याला या नाण्याची याच प्रकारातल्या बाकी नाण्यांशी तुलना करून लावता येतो.
नाण्यावर मागील बाजूनी अगदी ठळक असे ७ बिंदूंचे बनलेले फुल आहे त्याबाजूला वर्तुळ आहे. या नाण्यावर ‘छत्र’ च्या ऐवजी ‘छेत्र’ अंकित केलेले आहे. नाण्यांवरील फुल ठळक असल्याने नाणे मोहक वाटते, धातू तांबे असून त्यावर केमिकल रिऍक्शन मुळे हिरवी परत चालढलेली दिसते. नाण्याचे वजन ९.८ ग्राम आहे.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….