शिवराई भाग ३०
मित्रांनो,
आणि हि या सिरीज मधली शेवटची शिवराई ! मागील बाजूवर ‘छत्र’ च्या नंतर फुल असलेली शिवराई. या शिवराई नाण्याच्या पुढील बाजूवर आपल्याला ‘श्री’ नंतर वर्तुळ आणि खाली असलेल्या ‘राजा’ च्या नंतर दोन बारीक बिंदू पाहायला मिळतात आणि मागील बाजूवर छत्र च्या नंतर आहे स्पष्ट तीन पाकळ्या असलेले फुल. याच प्रकारचे फुल पुढील बाजूवरील ‘राजा’ शब्दानंतरही येते, ते पुन्हा कधीतरी नक्कीच दाखवेन. खाली असलेल्या ‘पति’ शब्दानंतर एक चौकट आकाराचा छोटा पण ठळक बिंदू दिसतो. असे आहे हे आजचे नाणे !
या शेवटच्या पोस्ट सोबतच #30ShivraiOn30Days हि सिरीज इथे संपवतो. आपल्याला आवडली असेल अशी आशा ! शिवराई सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता त्याला आपण दाद दिलीत त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद ! असाच पाठिंबा असू द्या….
या सिरींजमधील सर्व पोस्ट तुम्हाला एकत्र वाचायच्या असल्यास #30ShivraiOn30Days हा #Hashtag Facebook वर सर्च करा, तुम्हाला तिथे या सर्व पोस्ट एकत्र वाचायला मिळतील.
आता पुन्हा कधीतरी भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….