शिवराई भाग ८…
काल सांगितल्याप्रमाणे शाहु महाराजांच्या नावे असलेल्या शिवराईवर ‘शाउ, शाव, साव’ इ विविधता मजकुरात येते. आज सादर केलेल्या शिवराई वर ‘साव’ असा मजकुर आहे. आपल्याला माहितीए की शिवराई वर राज्यकर्त्या राजाचे नाव हे तिसर्या ओळीत येते, आणि त्यामुळे बर्याचदा हे नाव नाण्याबाहेर गेलेले असते.
सुरुवातीच्या शिवराईंवर हे कमी पण नंतरच्या बर्याच शिवराईंवर नाव बाहेरच गेलेले असते त्यामुळे पुर्ण मजकुर असलेली नाणी मिळवणं फार कठीण जातं.या नाण्यांचा Flan काही वेळा लहान तर काही वेळा मोठा येतो, सादर नाण्याचा Flan लहान असुन देखिल बराच मजकुर नाण्यावर आलाय म्हणुन हे नाणे सादर केले. या नाण्याला बिंदुमय वर्तुळ असल्याचे पहायला मिळते. तसेच मागील बाजुवर विविध चिन्हही पहायला मिळतात, ते चिन्ह पुढे सविस्तर पाहुच.
या नाण्यावर देखिल मागील बाजुवरील ‘छत्र’ च्या वर एक चिन्ह आलय, पण त्याबद्दल आता सांगणार नाहि. सादर केलेल्या नाण्यावर पुढील बाजुनी- ‘श्री/ राजा/ साव’ आणि मागील बाजुनी- ‘छत्र/ पति’ मजकुर अंकीत आहे. नाण्याचा धातु तांबे असुन वजन ग्राम आहे.
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….