महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,82,288

शिवराई भाग ९

By Discover Maharashtra Views: 3578 1 Min Read

शिवराई भाग ९…

आज सादर आहे ‘सिव’ मजकुर असलेली शिवराई. आपण याआधी सिव असलेली शिवराई पाहीली पण आज सादर सिव वेगळा आहे. नाण्यावरील अक्षरे अगदिच ठळक आणि सुबक आहेत. तसेच नाणे वेगळ्या अक्षरवळनामुळे आकर्षक देखिल वाटते. सादर शिवराई तांब्याची असुन वजन 8.77 ग्राम आहे. आपण वजनातील विविधता पहात आहात, तांबे धातुच्या बदलत्या किंमतीने शिवराई चे वजन कमी झाल्याचे दिसते, सुरुवातीची शिवराई 11 ते 13 ग्राम ची होती तर हि 9 ग्राम च्या जवळ आहे.
नाण्याच्या बॉर्डर बद्दल बोलायचे झाल्यास या नाण्यात खुप बदल आहे. आपण बिंदुमय वर्तुळ पाहिले पण या नाण्याला तसे नाही या नाण्याला लाइन ची बॉर्डर असुन त्यात फुल ओवल्यासारखे वाटतात. नाण्यावर पुढील बाजुवर- श्री/ राजा/ सिव आणि मागील बाजुवर- छत्र/ पति मजकुर आहे. पुढील बाजुवरील ‘जा’ आणि मागील बाजुवरील ‘छ’ चे वळनही वेगेळे आहे. असे आहे हे वगळे अक्षरवळन असलेले ‘सिव’ नाणे !

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

आपलाच
आशुतोष पाटील

Leave a comment