महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,066

श्री काळभैरवनाथ मंदिर, पिंपरी चिंचवड

By Discover Maharashtra Views: 1694 3 Min Read

श्री काळभैरवनाथ मंदिर, पिंपरी चिंचवड |
Shree Kalbhairavnath Temple, Pimpri Chinchwad –

पुण्याजवळील एक औद्योगिक शहर म्हणून पिंपरी – चिंचवड प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी चिंचवड वसले असून पूर्वी ते चिंचवाडी या नावानेही ओळखले जात असे. चिंचवडमधील मुख्य देवस्थान मोरया गोसावींनी स्थापित केलेले श्री गणेश देवस्थान हे असून या गणेश मंदिराव्यतिरिक्त इथे बाकी देवतांची मंदिरे सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, त्यामध्ये ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. (Shree Kalbhairavnath Temple, Pimpri Chinchwad)

काळभैरव हा शंकराचा अवतार असून कालभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरीनाथ, भैरोबा ही त्याची अन्य नावे आहेत. भैरवचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो. हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे. काळभैरवाच्या जन्माबद्दल अशी कथा सांगितली जाते कि, ब्रम्ह्देवांनी श्री शिवशंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचे भैरव प्रकट झाले, त्यांनी ब्रम्हाचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले. त्यामुळे भैरवांना ब्रम्ह्हत्येचे पातक लागले. सर्व तीर्थांना जाऊनही त्यांचे ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले नाही. शेवटी काशी क्षेत्री त्यांना पापमुक्ती मिळाली आणि ब्रम्हाचे मस्तक जिथे ठेवले, तिथे कपालमोचन तीर्थ बनले. ६४  भैरवांच्या प्रमुख असलेल्या काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. काशीला गेल्यावर पहिल्यांदा काळभैरवांचे दर्शन घ्यावयाचे आणि मग काशी विश्वेश्वराचे अशी प्रथा आहे.

चिंचवडमधील हे मंदिर दुमजली आहे. प्रवेशद्वारावर नक्षीदार दगडी कमान आहे. मंदिर स्थापनेचा काळ जरी नक्की माहिती नसला तरी हे मंदिर अंदाजे २०० – २५० वर्ष जुने आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर डाव्या हाताला शेंदुरचर्चीत हनुमानाची शिळा उभी आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर समोर ऐसपैस चौक आहे. त्याच्या दोन्ही बाजूला लाकडी नक्षीदार खांब असलेल्या ओवऱ्या आहेत. मंदिराला जाड भेंडाच्या भिंती आहेत. समोर असलेल्या दगडी पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य गाभाऱ्यासमोर जाता येते. गाभाऱ्याच्या डाव्या हाताला विठ्ठल – रुक्मिणीचे छोटे देऊळ आहे. त्याच्या शेजारी फेब्रुवारी २०१० मध्ये मूळ मूर्तीवरून निखळलेले शेंदराचे कवच ठेवले आहे. गाभाऱ्यामध्ये श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांच्या उभ्या मूर्ती आहेत. काळभैरवांच्या त्रिशूल, खट्वांग, खंजीर, कपाल हि आयुधे आहेत. तर पायात खडावा घातलेल्या आहेत. देवी जोगेश्वरीच्या वरच्या हातात त्रिशूल आणि डमरू आहे तर खालच्या दोन्ही हातातली आयुधे नीट कळत नाहीत.

हनुमान जयंतीला इथे जवळच्या वाल्हेकर वाडीतून मानाचे बगाड आणले जाते.दसऱ्याला श्री काळभैरवनाथांची पालखी गावाच्या वेशीपर्यंत येते.कार्तिक वद्य अष्टमीला मोठी यात्रा असते.

पत्ता : https://goo.gl/maps/MsSNwXZjMLm4Vbqc9

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment