श्री आत्मावरेश्वर मंदिर, शनिवार पेठ –
शनिवार पेठेत सकाळ प्रेस ऑफिसच्यासमोर एक छोटेसे पेशवेकालीन मंदिर आहे. ते श्री आत्मावरेश्वर मंदिर आहे.
पेशवाईतील एक सावकार शालूकर यांची नायकीण अनेक रोगांनी पिडलेली होती. ती वैद्य श्री. आत्माराम पुराणिक यांच्या औषधोपचाराने बरी झाली. तिने आपल्या मालकीची जमीन वैद्य बुवांना दिली. आत्मारामांचा मुलगा गणपतराव याने श्री आत्मावरेश्वर मंदिर बांधले. त्यामध्ये काळ्या पाषाणाच्या शाळुंकेत नर्मदेवरून आणलेला बाण (लिंग) बसवलेला आहे. त्यावर दुसरी शाळुंका बसवलेली आहे. शाळुंकेला गोमुख कोरलेले दिसते. अशा प्रकारचं शिवलिंग अन्यत्र कुठेही नसावे. या शिवापुढे असलेला सौष्ठवपूर्ण गुळगुळीत नंदी लक्षात राहतो. गाभाऱ्याच्या मागील भिंतीत अष्टभुजा देवी, गणपती व मारुती यांच्या मूर्तीही आहेत. नंदीच्या डावीकडे राम-लक्ष्मण-सीता व श्री हनुमान यांच्या मूर्ती आहेत.
हे मंदिर खाजगी आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा ते बंद असते.
संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर
पत्ता :
https://goo.gl/maps/VgDgjZUFxBJBMvQV8
आठवणी इतिहासाच्या